शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

राज आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये झूम अ‍ॅपद्वारे चर्चा, आदित्य ठाकरेही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 19:18 IST

Discussion between Raj Thackeray & Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - राज्यात भयावह वेगाने वाढत असलेला कोरोना विषाणू आणि दुसरीकडे सचिन वाझे व परमबीर सिंग प्रकरणात दररोज होत असलेले नवनवे गौप्यस्फोट होऊन आज गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ( Discussion between MNS Chief Raj Thackeray and Chief Minister Uddhav Thackeray through Zoom app, Aditya Thackeray also participated)

यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तात करण्यात आलेल्या दाव्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये झूम अ‍ॅपच्या माध्यमातून चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाल्याचे तसेच या चर्चेमध्ये आदित्य ठाकरे हेसुद्धा सहभागी झाल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात राज्यात लागू करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांबाबत चर्चा झाली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेदरम्यान इतर कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली. हे मात्र कळू शकलेले नाही. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरेंनी बैठकीआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत देखील फोनवरून चर्चा केली होती. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना सहाकार्य करण्याच आवाहन केले होते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना केले होते. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर आपण सर्वांनी सूचनांचं पालन करावं, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन मनसेने केले होते. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र