शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'फरक, जमिनीचा व हवेचा!', फोटो ट्विट करत काँग्रेस नेत्याचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

By ravalnath.patil | Updated: October 19, 2020 21:10 IST

Congress Leader Satyajeet Tambe : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे.

ठळक मुद्देयुवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबईः राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावरून युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सत्यजित तांबे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर देवेंद्र फडणवीस यांचा गेल्यावर्षी आलेल्या पूराची हॅलिकॉप्टरमधून पाहणी करतानाचा फोटो आणि आताचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतल्याचा फोटो, असे तीन फोटो ट्विट केले आहेत. तसेच,  या फोटोला सत्यजित तांबे यांनी फरक जमिनीचा व हवेचा, अशी कॅप्शन दिली आहे. तर, आणखी एका ट्विटमध्ये माणूस सत्तेवर असताना जमिनीवर पाहिजे, सत्ता गेल्यावर तर सगळेच जमिनीवर येतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असताना थेट बांधावरूनच या दोघांत वाकयुद्ध रंगले. मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी पलटवार केला आहे. 

उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीकाबिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि एक जबाबदार नेते आहात. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल, याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्यासाठी आधी काम करा. तुम्ही सध्या नियमितपणे बिहारला जात आहात. तसे थोडे दिल्लीतही जा. तुम्ही दिल्लीत गेलात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री थिल्लरपणा करत आहेत- फडणवीस  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. तसेच, इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.  

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र