अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रतिआव्हान, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Published: March 1, 2021 01:04 PM2021-03-01T13:04:42+5:302021-03-01T13:05:34+5:30

Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar : आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar | अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रतिआव्हान, म्हणाले...

अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रतिआव्हान, म्हणाले...

Next

मुंबई - आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावरूनही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा आम्ही तो वाजवून दाखवू असे आव्हान दिले होते. त्यानंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) या आव्हानाला विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिआव्हान दिले आहे. (Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar ) 

फडणवीस म्हणाले की, विधिमंडळाच्या कामकाजाबाबत घटनेनं जी जबाबदारी दिली आहे ती झटकायचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्यपालांनी नियमानुसार अध्यक्षपदाची निवडणूक घ्या असा सल्ला दिला होता. मात्र राज्य सरकारने तो ऐकलेला नाही. दरम्यान, काल अजित पवार यांनी केलेल्या विधानावरून अजित पवार यांच्या मनातली भीती दिसून आली. अजित पवार यांना अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांचेच आमदार, मंत्री विरोधात मदत करतील, अशी भीती वाटतेय, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच अजित पवार यांनी काल केलेल्या विधानाला काही अर्थ नाही, अशी टीकाही त्यांनी केली.  

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त आहे, नाना पटोले यांच्यावर काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना सभागृहात उपस्थित राहणे, आणि मतदान करणं शक्य नसल्याने यंदाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या वरळीतील पबमधील व्हिडीओंवरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. सोशल डिस्टंसिंग हे शिवजयंतीला असते. नाईट लाइफला तर सरकारने परवानगी दिलेली आहे. बाकी मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना सल्ले देत नाहीत, कारण मंत्री आपल्याला ऐकत नाहीत, हे त्यांना माहिती आहे. सरकारमधी अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे ते स्वत:च सगळे निर्णय घेतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Web Title: Devendra Fadnavis's response to the challenge given by Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.