शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 20:27 IST

Devendra Fadnavis Sanjay Raut: हरयाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मुंबईत जोरदार सेलीब्रेशन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता लक्ष्य केले. 

Devendra Fadnavis Latest news: हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने सरस कामगिरी केली. त्यामुळे देशभरात पक्षाला बळ मिळाले आहे. विधानसभेची निवडणूक होऊ घातलेल्या महाराष्ट्रातही भाजपाने जल्लोष केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीसांनी संजय राऊतांना चिमटे काढले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की, आम्ही विरोधी पक्षाशी हरलो नाही. कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती. आम्हाला हरवले ते चौथा पक्ष होता, फेक नरेटिव्ह नावाचा! त्या फेक नरेटिव्हने आम्हाला पराजीत केलं." 

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर

"देशातही आपण लोकसभा जिंकलो. पण, आपल्या ४० जागा कमी झाल्या. याचं कारण फेक नरेटिव्ह होतं. पण ज्यादिवशी आपल्या हे लक्षात आलं... महाराष्ट्रासहित देशात आपण ठरवलं की, आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने द्यायचं", असे फडणवीस निकालानंतर बोलताना म्हणाले.  

"महाविकास आघाडीचे लोक रात्रीच स्क्रिप्ट लिहून बसलेले"

"पहिली कसोटी हरयाणा, जम्मू काश्मिरमध्ये होती. हरयाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते. आम्ही जिंकणार, मग काय बोलणार? सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलू आणि काय काय नको, असं त्याला वाटतं होतं", अशा शब्दात फडणवीसांनी राऊतांवर नाव न घेता हल्ला चढवला.  

"मला त्यांना विचारायचंय, आता कसं वाटतंय? कारण जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक, आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरयाणामध्ये घडले, तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे", असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४