शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, तर…” देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला असा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 11:41 IST

Devendra Fadnavis News: भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती

मुंबई - गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठी आर्थिक हानी झाली होती. दरम्यान, भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, असे सांगितले. तसेच पूरस्थिती रोखण्यासाठी वेगळा पर्याय सुचवला आहे. (Devendra Fadnavis  Says,"A protective wall is not a solution to prevent floods, but A diversion canal is a good option'')

मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण भिंत बांधण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने काय ठरवले याची मला काही कल्पना नाही. मात्र संरक्षक भिंत हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. भिंत बांधली तरी त्याच्यावरून पाणी येणार. किंवा ते आऊटलँकिंग करणार, कारण या पाण्याचा वेग आणि दाब अधिक असेल. जे पाणी पावसाचं नाही. आपण पाऊस वाढल्यानंतर जेव्हा धरणाचा विसर्ग करतो तेव्हा चारही बाजूंनी पाणी एकत्र येतं. आपण एखाद्या ठिकाणी भिंत बांधून त्याचा फायदा होईल. मात्र यापेक्षा आमच्या सरकारच्या काळात निर्णय घेतल्याप्रमाणे डायव्हर्जन कॅनॉल तयार करून पुराचा धोका असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात नेला येईल. त्यासंदर्भात वर्ल्ड बँकेशी आपण चर्चा केली होती. त्याला तत्त्वता मान्यताही मिळाली होती. तो प्रकल्प सरकारने पुढे नेल्यास अधिक फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येतात. पूररेषा वारंवार ओलांडणाऱ्या नद्यांभोवती गाव आणि वस्त्यांच्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारता येईल का? याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. या निर्णयानुसार महाडमधील सावित्री नदी आणि चिपळूणमधील वशिष्ठी नदीला संरक्षक भिंत बांधण्यासा प्राधान्य दिले जाणार आहे. 

 

टॅग्स :floodपूरchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाKolhapur Floodकोल्हापूर पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे