देवेंद्र फडणवीस म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे सुचनाकार - गुलाबराव पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 13:45 IST2020-11-19T13:45:15+5:302020-11-19T13:45:57+5:30
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार हे सावकारी वृत्तीचे असल्याची टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे सुचनाकार - गुलाबराव पाटलांचा टोला
जळगाव : सूचना करणे हे विरोधकांचे काम आहे, देवेंद्र फडणवीस हे आमचे सुचनाकार असून त्यांनी सूचनाच कराव्यात असा टोला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. जिल्हा परिषदेत जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी जळगावात माध्यमांशी सवांद साधला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार हे सावकारी वृत्तीचे असल्याची टीका केली होती. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांचे काम आहे. सूचना करण्याचे आम्ही कामे करीत असतो, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. वीजबीलासंदर्भात आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दिव्यांगांसाठी शौचालय बांधकामचे प्रातिनिधीक स्वरूपात त्यांनी गुरूवारी उद्घाटन केले.