शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, देवेंद्र फडणवीस यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 15:11 IST

Tauktae Cyclone Devendra Fadnavis Bjp Ratnagiri : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. गतवर्षीच्या निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचेच झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ठळक मुद्देकाहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचंविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

खेड: राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आत्मविश्वासी नव्हे हे तर आत्मघातकी सरकार आहे. गतवर्षीच्या निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हे नेहमीचेच झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. सकाळच्या सत्रात त्यांनी खेड तालुक्यातील बोरज येथे भेट दिली. यादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, डॉ. विनय नातू, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना अजून पूर्ण मदत मिळालेली नाही. सलग दुसऱ्या वर्षी चक्रीवादळाचा दणका कोकणाला बसला आहे. कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे. किमान आता तरी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, असे ते म्हणाले. तालुक्यातील बोरज-घोसाळकर वाडी नजीक सोमवारी १७ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास वादळामुळे तुटलेल्या ३३ के व्ही विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने प्रकाश गोपाळराव घोसाळकर व वंदना प्रकाश घोसाळकर या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता.

फडणवीस यांनी आपल्या या दौऱ्यात घोसाळकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. राज्य सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या सदस्याला नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRatnagiriरत्नागिरीTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ