शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त; सरकारी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

By हेमंत बावकर | Updated: November 4, 2020 17:35 IST

Devendra Fadnavis News: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 24 ऑक्टोबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी ! असे आवाहन फडणवीस यांनी केले होते.

देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. त्यामध्ये, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. 

 देवेंद्र फडणवीस यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले. रविवारी २०० मिली तर सोमवारी सायंकाळी तेवढाच प्लाज्मा देण्यात आला होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी किंचित कमी झाल्याने त्यांना काही स्टेरॉईडस् आणि रेमडेसीवरही देण्यात आले होते. 

अजित पवारांचीही कोरोनावर मात

राष्ट्रवादीचे राज्यातील मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  देखील कोरोनाची लागण झाली होती. ते मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले होते. गेल्या 8 दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच  कोरोनावर मात केली आहे. अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर, त्यांनीही खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीवरून उलटसुलट चर्चा सुरु होत्या.  

राज्यातील कोट्यवधी जनता व कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच डॉक्टर,नर्स, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही दिवस घरी विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचे आभार!, असे ट्विट अजित पवार  यांनी केले आहे. राज्यातील आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा