शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण आमच्या अंगवार आल्यावर आम्ही सोडत नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 17:16 IST

Devendra Fadnavis: भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

ठळक मुद्दे'तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. '

मुंबई: भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावप टीकेची झोड उठत आहे. 'वेळ आली तर शिवसेना भवन फोडू', असं वक्तव्य लाड यांनी केलं. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्यासाठी हा विषय संपलाय', असं फडणवीस म्हणाले. 

...पण अंगावर आलं तर सोडत नाहीमुंबईत भाजप कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी बोलताना टोकाचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, 'तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडीओ काढून स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलाय. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही,' असा इशारा दिला.

काय म्हणाले होते प्रसाद लाड ?"नारायण राणेंना स्वाभीमानचा खूप मोठा गट आज राणेंमुळे भारतीय जनता पक्षात आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. पुढच्या वेळी आपण जरा कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगूयात गणवेशात येऊ नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला त्यांचा उपयोग होईल. एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू" असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrasad Ladप्रसाद लाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा