शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र; मोदींकडे केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:00 PM

Declare Covid a natural calamity let SDRF be used to help people affected by curbs CM Uddhav Thackeray urges PM Modi: राज्यासह देशात कोरोनाचा वाढता कहर; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'ब्रेक द चेन' मोहिमेची घोषणा केली. आजपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील १५ दिवस राज्यात कलम १४४ लागू असेल. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय राज्य आपत्ती मदत निधीच्या (एसडीआरएफ) माध्यमातून प्रभावित व्यक्तींना मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. (Declare Covid a natural calamity let SDRF be used to help people affected by curbs CM Uddhav Thackeray urges PM Modi)“महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”मुख्यमंत्री ठाकरेंनी मंगळवारी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं. 'भूकंप, अवर्षण, पूर आल्यानंतर नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाते. त्यानंतर याचा फटका बसलेल्यांना आर्थिक मदत दिली जाते. कोरोना संकटाला आपण सगळ्यांनी एक नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांची उपजीविका संकटात सापडली आहे, त्यांना आर्थिक मदत दिली जावी,' असं मुख्यमंत्री म्हणाले होते.कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यावर किती वेळात होते लागण?; वाचून धक्का बसेलमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिल्याच्या वृत्ताला मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी दुजोरा दिला. 'कोरोना संकट एक आपत्ती आहे. पण या संकटाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या संकटाचा फटका बसलेल्यांना वैयक्तिक स्वरुपात आर्थिक मदत देता येत नाही. कोरोनाला नैसर्गिक संकट घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात यावा. केंद्रानं यासंदर्भात पावलं उचलायला हवीत,' असं कुटेंनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या