शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

जनाब देवेंद्र फडणवीस; रोझा-इफ्तारचं 'ते' पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

By कुणाल गवाणकर | Updated: January 2, 2021 13:01 IST

अडीच वर्षांपूर्वीचं दावत-रोझा-इफ्तारचं पोस्टर व्हायरल

मुंबई: शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून भाजपानं शिवसेनेवर टीका केली असताना आता सोशल मीडियावर दावत-रोझा-इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत. त्यांच्या नावांपुढेही जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे. ट्विटर, फेसबुकवर या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दावत-रोझा-इफ्तारचं आयोजन अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये इफ्तारची तारीख (७ जून २०१८) देण्यात आली आहे. मुंबईतील सीएसटी येथील पलटन रोड परिसरातील हज हाऊसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. त्यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरवर असून त्यापुढे जनाब लिहिण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर पाहुणे म्हणून भाजप नेते शाहनवाझ हुसेन, तत्कालीन मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांचा उल्लेख आहे. पोस्टरवरील मजकुरासाठी हिरवा रंग वापरण्यात आला आहे. भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश असलेले इफ्तारचं हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.शिवसेनेच्या कॅलेंडरवर भाजपची जोरदार टीकाशिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वर भाजपानं जोरदार टीका केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात उर्दू मजकूरासह शिवसेनेनं शिवशाही हे कॅलेंडर छापलं असून त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवशाही कॅलेंडरचा फोटो ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवशाही कॅलेंडरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी यासोबत "शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही...," असं म्हणत खोचक टोला लगावला. "शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही," असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshish Shelarआशीष शेलारGopal Shettyगोपाळ शेट्टीVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाShiv Senaशिवसेना