शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

संघराज्याच्या संकल्पनेला केंद्र सरकारकडून तडा; खासदार सुनिल तटकरे यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 7:24 PM

राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी हाेणार असल्याने त्याला सर्वच विराेधकांनी कडाडून विराेध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकृषी विधेयक, कामगार विधयेक, पाेर्ट संबधीची अशी विविध विधयेके केंद्र सरकारने बहुमतांच्या जाेरावर पारीत केली आहेतघटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघराज्याच्या संकल्पनेलाच तडा जाणार आहे. सरकारने शेतकरी, कामगार यांच्या विराेधात आणणलेल्या विधयेकांविराेधात राज्यात असंताेष आहे

रायगड - केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विविध विधयके बहुमतांच्या जाेरावर पारीत केली आहेत. अशा विधेयकांमुळे केंद्र सरकार राज्य सरकारांच्या अधिकारावर गदा आणत आहे. त्यामुळे घटनाकार डाॅॅॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मुळ संघराज्याची संकल्पना धुळीत मिळवली जात आहे. अशी जाेरदार टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी केली.निसर्ग चक्रीवादळात पाेल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत आढावा घेण्यासाठी ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आले हाेते. त्यानंतर राष्ट्रवादी काॅग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

कृषी विधेयक, कामगार विधयेक, पाेर्ट संबधीची अशी विविध विधयेके केंद्र सरकारने बहुमतांच्या जाेरावर पारीत केली आहेत. विराेधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेला प्रखर विराेध केला आहे. पाेर्टच्या विधयेकामुळे पाेर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे. तसेच विविध राज्यात असणाऱ्या पाेर्टच्या परिसरातील जमिनींचे झाेन बदलून राज्य सरकारच्या पूर्व परनावगी शिवाय केंद्र सरकार जमीनींचा ताबा घेणार आहे. त्यामुळे घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघराज्याच्या संकल्पनेलाच तडा जाणार आहे. राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी हाेणार असल्याने त्याला सर्वच विराेधकांनी कडाडून विराेध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले.

सरकारने शेतकरी, कामगार यांच्या विराेधात आणणलेल्या विधयेकांविराेधात राज्यात असंताेष आहे. याप्रश्नी राष्ट्रवादी काॅंग्रेस रस्त्यावर उतरुन जन आंदाेलन छेडणार असल्याकेड त्यांनी लक्ष वेधले. मच्छिमारी बंदरांचा विकास व्हावा यासाठी मुरुड तालुक्यातील खाेरा बंदर, श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर आणि दापाेली तालुक्यातील हर्णे बंदरांचा विकास सागरमाला याेजनेंतर्गत करावा अशी मागणी संबंधीत विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी तातडीने द्यावा अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.कांदा निर्यातीवरील बंदी उठवून उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून लवकरच ती सुरु करुन शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, राज्याचा जीएसटीचा परतावा तातडीने द्यावा, महाड येथे कायमस्वरुपी एनडीआरएफचा कॅंप द्यावा, मुंबई-गाेवा महामार्गाच्या पहील्या टप्यासाठी निधी उपलब्ध करावा, एलआयसीचे खासगीकरण करु नये, कुलाबा किल्याच्या डागडुजीसाठी निधी द्यावा अशी मागण्या केंद्र सरकारकडे केल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी