शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: त्यामुळे कोरोना फैलाव होत असतानाही मोदींपासून भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री टाळताहेत लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 09:53 IST

coronavirus in India : देशाला संबोधित करताना कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांचा उहापोह करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशात व्यापक लॉकडाऊन (lockdown ) होणार नसल्याचे संकेत दिले. त

ठळक मुद्दे पंतप्रधान मोदींनी देशात व्यापक लॉकडाऊन होणार नसल्याचे दिले संकेत राज्यांनीही शेवटचा पर्याय म्हणूनच लॉकडाऊनचा अवलंब करावा, असा सल्ला मोदींनी दिलामोदींप्रमाणेच विविध भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही लॉकडाऊन लावणे टाळत आहेत

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात चिंताजन परिस्थिती निर्माण झाली आहे. (coronavirus in India) काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी काल देशाला संबोधित केले. मात्र संबोधनात कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांचा उहापोह करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशात व्यापक लॉकडाऊन (lockdown ) होणार नसल्याचे संकेत दिले. तसेच राज्यांनीही शेवटचा पर्याय म्हणूनच लॉकडाऊनचा अवलंब करावा, असा सल्ला दिला. एकीकडे देशातील विविध राज्यांत लॉकडाऊन तसेच इतर कडक निर्बंध लागू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत लॉकडाऊन हा विषय टाळला जात आहे. त्यामागची कारणे आता समोर येत आहेत. (So even though the corona is spreading, the PM Narendra Modi & chief ministers of BJP-ruled states are avoiding lockdown ) 

गेल्यावर्षी देशात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र एकाएकी झालेल्या या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सरकारवर टीकेजी झोड उठली होती. तसेच लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तसेच स्थलांतरीत मजुरांचीही मोठ्या प्रमाणात फरफट झाली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेलाही लॉकडाऊनमुळे मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच मोदींना काल आपल्या भाषणात चार वेळा लॉकडाऊन हा शब्द वापरला मात्र राज्यांना लॉकडाऊन न करण्याचा सल्ला दिला. मोदींप्रमाणेच विविध भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही लॉकडाऊन लावणे टाळत आहेत. त्यामागे त्यांच्या राजकीय अडचणीही आहेत.

दरम्यान, देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रकारे लॉकडाऊन न लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरून भाजपाशासित राज्यांना याची आधीची माहिती दिली गेली असावी, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच या राज्यांकडून लॉकडाऊनला नकार दिला जात आहे. लॉकडाऊन लावला गेल्यास राज्यांच्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम होतो. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद पडले होते. मजूर, कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले होते. त्यातून अनेक राज्ये अद्याप सावरलेली नाहीक, व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याच्या स्वप्नालाही ग्रहण लागले आहे. लॉकडाऊनचा फटका सरकारी तिजोरीलाही बसतो. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यावेळी लॉकडाऊन लावण्याच्या बाजूने नाही आहेत. त्याचे पालन भाजपाशासित राज्यांकडूनही होत आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण