शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'कोरोनाला आमत्रंण देणाऱ्यांनाच ऑक्सिजनची गरज',  संजय राऊत यांचा मनसेला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 14:56 IST

Sanjay Raut News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम असतांना काही आदर्श काम करण्याऐवजी केवळ विरोधाला विरोध म्हणून दहीहांडी साजरी करुन कोरोनाला आमत्रंण देण्याचे जे काही केले जात आहे,

ठाणे  : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट कायम असतांना काही आदर्श काम करण्याऐवजी केवळ विरोधाला विरोध म्हणून दहीहांडी साजरी करुन कोरोनाला आमत्रंण देण्याचे जे काही केले जात आहे, त्यांनाच उद्या या ऑक्सीजनची गरज लागणार असल्याची खरमरीत टिका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर केली आहे. (Only those who invite coronavirus need oxygen, Sanjay Raut tweaks MNS)

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लानटचे लोकार्पण ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ही टिका केली. आज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिस:या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना बाबत काही र्निबध कायम ठेवण्यात येत आहेत. परंतु असे असतांना मनसेने हे निर्बंध झुगारुन दहीहांडी उत्सव साजरा केला आहे. त्यावरुन राऊत यांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. दहीहांडी उत्सव साजरा करुन केवळ कोरोनाला आमत्रंण देण्याचे कामच या मंडळींकडून सुरु आहे. त्यामुळे अशांनाच आता या ऑक्सीजनची गरज लागणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्र, केरळ, मेघालय या तीन राज्यांना कोरोनाच्या तिस:या लाटेचा धोका संभावण्याची अधिक शक्यता आहे. परंतु तरी देखील महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष आणि संघटना, मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद करतात.दहीहांडीसाठी आंदोलन करीत आहेत, परंतु आमचे ऐकू नका, केवळ विरोधाला विरोध केला जात आहे.

परंतु केंद्र सरकारने सल्ला दिला आहे, की महाराष्ट्राला धोका आहे, म्हणून आता तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शहा हे हिंदु विरोधी आहेत असे म्हणाल का? असा सवालही त्यांनी राज्यातील भाजपच्या मंडळींना करीत तुम्हाला घंटाच वाजवायचा असेल तर दिल्लीत जाऊन वाजवा महाराष्ट्रात घंटा वाजवू नका असा सल्लाही दिला.

ऑक्सीजन हा मोकळ्या हवेतून मिळतो आणि तो पुरसा आहे, असे वाटत होते. परंतु, कोरोनाने वेगळे शिकविले आहे, हा ऑक्सीजन पुरेसा नाही, रुग्णांसाठी खास करुन कोरोना रुग्णांसाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ऑक्सीजनची गरज असते, त्याचा सुध्दा तुटवडा पडल्यावर माणसांना प्राण गमवावे लागतात. परंतु महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे आतार्पयत ऑक्सीजन अभावी एकाचेही प्राण गेलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMNSमनसे