शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

CoronaVirus Live Updates : "मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?"; भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:34 IST

BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over CoronaVirus in Maharashtra : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवला जात असून, कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. कोरोना संदर्भातील आकडेवारीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. 

प्रविण दरेकर यांनी उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. तसेच कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेली Ventilators, Oxygen, Remdesivir, Vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली? असा सवाल देखील विचारला आहे.  मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? असं म्हणत दरेकरांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. 

आकडे लपवले जात असल्याचा गंभीर आरोप

"RTPCR चाचण्या कमी करून संसर्ग दर कमी दाखविले जात असल्यासंदर्भात तसेच #Covid19 मुळे झालेले मृत्यू अन्य कारणांमुळे झाले असल्याची नोंद होत आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महानगरपालिकेने आणखी संशय वाढवला" असं म्हटलं आहे. तसेच "RTPCR चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर २३.४३% पर्यंत कसा गेला, हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून ११.२३% व एप्रिलमध्ये १८.०६% पर्यंत गेला, ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?" असा संतप्त सवाल देखील भाजपाने केला आहे. 

"केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेली Ventilators, Oxygen, Remdesivir, Vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली?"

"विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे. कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेली ventilators, oxygen, Remdesivir, vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली? याचा लेखाजोखा प्रथम जयंत पाटलांनी जनतेला द्यावा. सांगली, सातारा, पुण्याला किंवा प्रभावशाली मंत्र्यांकडे या वस्तू किती झिरपल्या, ते आधी सांगावे" असं देखील प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसOxygen Cylinderऑक्सिजनremdesivirरेमडेसिवीरpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस