शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा, लावतात लोकांना चुना’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 10:02 IST

Maharashtra Politics News : बनावट रेमडेसिविर रॅकेटमधील एक आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत असून, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यात महाराष्ट्राला तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. (Coronavirus in Maharashtra) मात्र महाराष्ट्रात कोरोनासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमॉल भरून ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. (Fake Remdesivir racket) यातील एक आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत असून, त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize NCP for Fake Remdesivir racket)

या घटनेची बातमी शेअर करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. साहेब आणि कार्यकर्ते अगदी शेम टू शेम; राष्ट्रवादी पुन्हा लावतात लोकांना चुना. हे शक्य झालंय साहेबांच्या धोरणामुळे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.  

दरम्यान, बारामतीमध्ये मोकळ्या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड पॅरासिटीमॉल भरून ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. या बनावट रेमडेसिविर विक्रीमध्ये बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेला देखील मोठा धक्का बसला आहे.

या प्रकरणी मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय ३५, रा. काटेवाडी, ता. बारामती) याच्यासह प्रशांत सिध्देश्वर घरत (वय २३, रा. भवानीनगर, ता. इंदापूर),संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय २२, रा. काटेवाडी, ता. बारामती) यांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. यातील  मुख्य सुत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर