शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Bihar Assembly Election 2020: कोरोना संपला का? बिहार निवडणुकीवरून संजय राऊतांचा बाण; भाजपवरही शरसंधान

By कुणाल गवाणकर | Updated: September 25, 2020 15:01 IST

सुशांतच्या मृत्यूचा वापर केवळ निवडणुकीतील राजकारणासाठी; राऊतांची थेट टीका

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईची, इथल्या पोलिसांची बदनामी करण्यात आली. बिहारमधल्या सत्ताधाऱ्यांकडे कोणताही मुद्दा नसल्यानंच भावनिक गोष्टींचा आधार घेतला जात असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असताना राऊत यांनी बिहार निवडणूक, सुशांत सिंह राजपूत प्रकरणासह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई, उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी याबद्दलची शिवसेनेची भूमिका यावर सविस्तर भाष्य केलं. एका बूथवर 1000 मतदार, वेळेची मर्यादा वाढवली; कोरोनाग्रस्तांनाही करता येणार मतदान'कोरोनामुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती आहे. सध्या लोकांना निवडणुका नकोत, तर काम हवंय. निवडणुका घेण्यासारखी स्थिती बिहारमध्ये आहे का?, याचा विचार व्हायला हवा. कोरोना संपला असेल, तर मग निवडणूक आयोगानं तसं जाहीर करायला हवं,' असं राऊत म्हणाले. 'विकासाचे मुद्देच नसल्यानं सुशांत सिंह राजपूतच्या नावावर बिहारमध्ये भावनिक मुद्दे तापवले जात आहेत. सुशांत हाच तिथे प्रचाराचा मुद्दा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं पोस्टरदेखील छापले आहेत,' अशा शब्दांत राऊत यांनी बिहारच्या राजकारणावर भाष्य केलं.बिहारमध्ये दिवाळीपूर्वीच 'फटाके वाजणार'; विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर'बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांवर टीका करत होते. आता त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. ते बक्सरमधून निवडणूक लढवणार आहेत. सुशांतवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात त्यांनी पडदे ओढण्याचं काम केलं. सुशांत प्रकरणावरून सगळं नाट्य रचण्यात आलं. दिग्दर्शन, नेपथ्य, संहिता, पार्श्वसंगीत सगळं काही ठरवून करण्यात आलं,' असंदेखील राऊत पुढे म्हणाले. नितीश कुमार यांच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच हे सगळं करण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी केला."मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते"सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्यात आली. मात्र महिन्याभरानंतरही सीबीआयचे हात रिकामेच आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता अनेक कलाकारांची चौकशी करत आहे. मात्र सीमेवरून देशात अंमली पदार्थ येऊ न देणे हे त्यांचं खरं काम आहे, असं राऊत यांनी म्हटलं.उत्तर प्रदेश सरकार चित्रपट नगरी उभारत असेल, तर चांगलंच आहे. प्रत्येक राज्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्यामुळे मुंबईचं वैभव कमी होणार नाही. कलाकारांनी मोठ्या कष्टानं मुंबईला घडवलं. तुम्ही चित्रपट नगरी उभाराल. पण राज कपूर, देवानंद कुठून आणाल? असा सवाल राऊत यांनी विचारला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यासारख्या कलाकारांनी इथेच नाव कमावलं. ही मंडळी चित्रपट नगरी सुरू झाली म्हणून उत्तर प्रदेशात जाणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत