भाजपा करतेय घटनात्मक हक्कांची पायमल्ली : गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:20 IST2019-01-21T06:20:39+5:302019-01-21T06:20:57+5:30
भाजप घटनात्मक हक्क पायदळी तुडवीत आहे, असा आरोप करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूरच्या पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात डांबण्याच्या मणिपूरमधील भाजप सरकारचा निषेध केला.

भाजपा करतेय घटनात्मक हक्कांची पायमल्ली : गांधी
नवी दिल्ली : भाजप घटनात्मक हक्क पायदळी तुडवीत आहे, असा आरोप करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूरच्या पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात डांबण्याच्या मणिपूरमधील भाजप सरकारचा निषेध केला.
विरोधकांची गळचेपी करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्याचा आणखी एक प्रयत्न होय. गेल्या काही महिन्यांपासून भाजप सरकार जनतेच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणीत आहेत, असे राहुल गांधी यांनी मणिपूरचे पत्रकार किशोर चंद्र वांगखेम यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. इम्फाळमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीत वांगखेम हे होते. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना रासुकाखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.
हिंसाचार करून कायदा हातात घेणाऱ्या शक्तींना रोखण्याऐवजी सरकारच्या उत्तरदायित्वाबाबत जाब विचारणाºयांना तुरुंगात डांबले जात आहे, हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.