शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाराजी नाट्य; अजित पवारांचा फोन जाताच उपोषण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:48 IST

अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती.

अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेस आमदारांच्या कार्यक्षेत्रातील नगरपालिकांना निधी देण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत, काँग्रेसच्या ११ आमदारांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करताच आ. कैलास गोरंट्याल यांनी आपले उपोषण मागे घेतले.

विकास निधीच्या माध्यमातून काँग्रेस दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. जर राष्ट्रवादीकडून अशा पद्धतीने काँग्रेसच्या आमदारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले तर, हा दबाव गट कामाला येईल, असा प्रयत्न यामागे असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. विविध मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी २५/१५ या नियमाखाली निधी दिला जातो. या निधीचे वाटप करताना राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देण्यात आले. नगर विकास विभागाकडून देण्यात येणाऱ्या निधीमध्ये देखील शिवसेनेच्या आमदारांना झुकते माप दिले गेले. काँग्रेसचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत तिथल्या नगरपालिकांना पुरेसा निधी मिळाला नाही.

अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. हा विषय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातला होता. थोरात म्हणाले, ठाकरे आणि अजित पवार दोघांशीही बोललो आहे.मधल्या काळात काही निधी कमी दिला गेला, पण पुरवणी मागण्यांमध्ये सगळ््यांना व्यवस्थित निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमदारांची नाराजी असणे समजू शकतो, कारण प्रत्येकाला आपल्या मतदारसंघासाठी विकास कामांकरता निधीला पाहिजे असतो. मात्र लगेच सरकारवर संकट आले, असा त्याचा अर्थ काढणे योग्य नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

उर्वरित दहा आमदार कोण आहेत असे विचारले असता आमदार गोरंट्याल म्हणाले, त्यांची नावे घेणे योग्य नाही. दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रात या अनुषंगाने खासदार निधी गोठण्याचा मुद्दा पुढे आणण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार उपोषण करत आहेत, लोकशाही वगैरे मान्य आहे, मात्र ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल, असा नाराजीचा सूरही लावला आहे.नाईलाजाने उपोषणाचा मार्ग निवडलाआ. कैलास गोरंट्याल म्हणाले, माझ्या मतदारसंघात नगरपालिकेसाठी नगर विकास विभागाने निधी दिला नाही. माझ्यासोबत आणखी दहा आमदार असे आहेत, ज्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळेच आम्ही नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: आपल्याला फोन केला आणि निधी देतो, पुरवणी मागण्यांत व्यवस्था करतो, असे सांगितले. आम्ही उपोषण करणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस