शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Rajiv Satav: २०१४ च्या मोदी लाटेतही फडकवला होता काँग्रेसचा झेंडा; राजीव सातव यांच्या विजयाची गोष्ट

By प्रविण मरगळे | Updated: May 16, 2021 13:26 IST

Congress MP Rajiv Satav Passed Away: राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते.

ठळक मुद्देमाजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. परंतु त्यानंतर राजीव सातव यांनी कधीही राजकारणात मागे वळून पाहिलं नाहीस्वकर्तृत्वावर राजीव सातव यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. २००९ मध्ये आमदार म्हणून कळमनुरी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला.

प्रविण मरगळे/विजय नपाते

मुंबई – काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सातव यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोकप्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे. राजीव सातव यांच्या जाण्यानं मी माझा मित्र गमावला अशा भावना व्यक्त करत राहुल गांधींना दु:ख अनावर झालं.

राजीव सातव हे अत्यंत मनमिळाऊ आणि उमदं असं नेतृत्व होतं. सातव यांच्या साधेपणामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाची इतकी मोठी जबाबदारी असूनही मतदारसंघात त्यांनी घट्ट पाय रोवले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राजीव सातव हे कळमनुरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. परंतु त्यानंतर राजीव सातव यांनी कधीही राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. स्वकर्तृत्वावर राजीव सातव यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. 

२००९ मध्ये आमदार म्हणून कळमनुरी मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला. या निवडणुकीत राजीव सातव यांनी शिवसेनेच्या गजानन घुगेंचा ८ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात बांधणीला सुरूवात केली. याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी काळात हिंगोली मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत होता. त्यामुळे राजीव सातव यांना उमेदवारी मिळेल का नाही? याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. परंतु राजीव सातव यांनी या चर्चांकडे दुर्लक्ष करत मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेणे. संपर्क वाढवण्याचं काम सुरूच ठेवलं. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या लोकसभेच्या खासदार होत्या. त्यानंतर शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंनी त्यांचा पराभव केला होता. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट होती. या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तडजोडीत हिंगोली मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीकडून मागून घेतला. तेव्हा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर पक्षातंर्गत टीकाही झाली होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा पराभव करत लोकसभेत विजय मिळवला. अवघ्या १ हजार ६३२ मतांनी राजीव सातव यांना विजय मिळाला होता. परंतु मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे २ खासदार निवडून आले होते त्यात राजीव सातव यांचं नाव होतं. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार   २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. याचं कारण असं की, राजीव सातव हे राहुल गांधींचे विश्वासू शिलेदार होते. २०१९ च्या निवडणुकीत राजीव सातव यांच्यावर गुजरात, दीव दमण या राज्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी आली. त्याचसोबत पंजाब येथील निवडणुकीतही त्यांना लक्ष घालण्यास सांगितलं होतं. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने राजीव सातव यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षीय कामातून मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ नये या विचाराने राजीव सातव यांनी पक्षसंघटनेला जास्त महत्त्व दिलं. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राजीव सातव यांनी केलेल्या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमपिचवर सातव यांनी भाजपाला घाम फोडला होता. त्यामुळे राजीव सातव यांच्या अचानक जाण्याने काँग्रेससाठी खूप मोठी हानी म्हणता येईल.

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली