शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नवसंजीवनी देणाऱ्या विदर्भावर काँग्रेसची मदार, इंदिरा गांधी यांनाही दिली होती साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 07:45 IST

Congress News : पडत्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर - पडत्या काळात संजीवनी देणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा काँग्रेसने फोकस केला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भाने ज्यावेळी काँग्रेसला भरीव साथ दिली त्याच वेळी काँग्रेसला राज्याच्या सत्तेची चावी मिळाली. ही बाब हेरून काँग्रेस श्रेष्ठींनी विदर्भातून भविष्यातील सत्तेचा मार्ग सुकर करण्याची रणनीती आखली आहे. यापूर्वी आबासाहेब खेडकर, नाशिकराव तिरपुडे, रणजित देशमुख, प्रभा राव, माणिकराव ठाकरे या विदर्भातील नेत्यांनी प्रदेश काँग्रेसचे यशस्वीपणे नेतृत्व केले. त्याचा फायदाही काँग्रेसला वेळोवेळी झाला.  आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनाही विदर्भानेच साथ दिली होती. २०१४ मध्ये विदर्भातून काँग्रेसला ६२ पैकी फक्त १० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. मात्र, २०१९ मध्ये त्यात काहीशी वाढ झाली व १६ जागा निवडून आल्याने काँग्रेसचे संख्याबळ वाढले. एवढेच नव्हे तर गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून काँग्रेसचे एकमेव खा. बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभेतून विजयी झाले. पटोले यांच्या नियुक्तीने काँग्रेसला संकटात पाठबळ देणाऱ्या विदर्भाचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेेत आला आहे. 

फडणवीसांना रोखण्यासाठी रणनीती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपचा मुख्य चेहरा आहेत. फडणवीसांची राज्यभरातील घोडदौड थांबवायची असेल तर त्यांना अधिकवेळ विदर्भात गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. विदर्भाला झुकते माप देण्यामागे काँग्रेसची हीदेखील रणनीती आहे. विदर्भातूनच सत्तेचा मार्गविदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. पैकी ३५ ते ४० जागा जिंकल्या तरच इतर विभागांच्या पुरवठ्याने काँग्रेस ८० पर्यंत मजल मारू शकते, असा काँग्रेसमधील धुरिणांचा अंदाज आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणNana Patoleनाना पटोले