चंद्रपूर: देशामध्ये कोरोनाच्या काळात विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी नमामी गंगे अभियान सुरू केलं होतं. मात्र आता परिस्थिती 'शवामी गंगे' अशी झाली आहे, अशी टीका चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून गंगा नदीमधून मृतदेह वाहून येत आहेत. ते कोरोना रुग्णांचे असल्याचा संशय बिहारच्या बक्सरमधील नागरिकांना आहे. याबद्दल भाष्य करताना धानोरकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं; पास आल्यानंतर तासाभरानं सोडलंआज गंगा नदीवर ४० टक्के लोकांचं जीवनमान अवलंबून आहे. जगाच्या नकाशावर सांस्कृतिक व पवित्र नदी असा उल्लेख आहे. आज ७ वर्षाच्या मोठा कालखंड लोटूनदेखील केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे व नियोजनशून्य कामामुळे नमामी गंगेचे शवामी गंगेत रूपांतर झाल्याचे दिसून येते. नदीच्या पात्रात शेकडो मृतदेह वाहत येत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भारताची मान शरमेनं खाली गेल्याचं खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटलं. हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सूचनांना सामावून घेण्याचं आवाहनही खासदार बाळू धानोरकर यांनी केलं.येत्या आठवड्यापासून भारतात मिळणार स्पुटनिक व्ही लस; जुलैमध्ये देशात सुरू होणार उत्पादन२०१४ रोजी भारतातील प्रदूषित गंगा नदी आपण स्वच्छ करू त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि गंगे असा कार्यक्रम राबवला. २०१५ मध्ये भाजप सरकारने या नदीच्या पंचवार्षिक स्वच्छता योजनेसाठी २० हजार कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिले होते. मोदींचा वाराणसी मतदारसंघात गंगेच्या तीरावरील एक महत्वाचं यात्रास्थळ आहे. तिथे देखील अशीच विदारक परिस्थिती आहे. गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झांरी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जातोय. उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य बनत चाललं आहे. त्यामुळे जगात देशाचे नाव चुकीच्या पद्धतीने जात आहे. कोरोनाच्या उपायोजना करण्याकरिता विरोधी पक्षाच्या सूचना देखील विचारात घ्याव्या, कोरोनाविरुद्धची लढाई ही फक्त भाजपाची नसून सर्वांची आहे. त्यामुळे या लढाईत राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे अशी विनंती महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
CoronaVirus News: "मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे नमामी गंगेचं रुपांतर शवामी गंगेत झालंय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:22 IST