शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Naseem Khan: मुख्यमंत्र्यांनी वेळ संपली तरीही प्रचार केला; काँग्रेसचे नसीम खान दिलीप लांडेंविरोधात उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:30 IST

Congress Mohammed Arif Naseem Khan against Dilip Lande, uddhav Thackeray: नसीम खान यांची दिलीप लांडे यांच्याविरोधात निवडणूक याचिका. विधानसभेला खान हे चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान (Mohammed Arif Naseem Khan) यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. (election petition filed by senior Congressman and former minority affairs minister Mohammed Arif Naseem Khan against now Shiv Sena MLA Dilip Lande)

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खान हे चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते. खान यांनी निवडणूक याचिकेत म्हटले आहे की, २० ऑक्टोबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतर प्रचार केला होता. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान घेण्यात आले होते.

तसेच प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, असेही खान यांनी याचिकेत म्हटले आहे. प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास उरले असताना प्रचार न करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असताना ठाकरे यांनी हा नियम मोडला. बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेमुळे लांडे ४०९ मतांनी निवडून आले, असे खान यांनी याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNaseem Khanनसीम खानcongressकाँग्रेसchandivali-acचांदिवली