Naseem Khan: मुख्यमंत्र्यांनी वेळ संपली तरीही प्रचार केला; काँग्रेसचे नसीम खान दिलीप लांडेंविरोधात उच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 08:29 AM2021-08-27T08:29:25+5:302021-08-27T08:30:23+5:30

Congress Mohammed Arif Naseem Khan against Dilip Lande, uddhav Thackeray: नसीम खान यांची दिलीप लांडे यांच्याविरोधात निवडणूक याचिका. विधानसभेला खान हे चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते.

Congress Mohammed Arif Naseem Khan election petition against Shiv Sena MLA Dilip Lande, uddhav Thackeray pdc | Naseem Khan: मुख्यमंत्र्यांनी वेळ संपली तरीही प्रचार केला; काँग्रेसचे नसीम खान दिलीप लांडेंविरोधात उच्च न्यायालयात

Naseem Khan: मुख्यमंत्र्यांनी वेळ संपली तरीही प्रचार केला; काँग्रेसचे नसीम खान दिलीप लांडेंविरोधात उच्च न्यायालयात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान (Mohammed Arif Naseem Khan) यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. (election petition filed by senior Congressman and former minority affairs minister Mohammed Arif Naseem Khan against now Shiv Sena MLA Dilip Lande)

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खान हे चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते. खान यांनी निवडणूक याचिकेत म्हटले आहे की, २० ऑक्टोबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतर प्रचार केला होता. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान घेण्यात आले होते.

तसेच प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, असेही खान यांनी याचिकेत म्हटले आहे. प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास उरले असताना प्रचार न करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असताना ठाकरे यांनी हा नियम मोडला. बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेमुळे लांडे ४०९ मतांनी निवडून आले, असे खान यांनी याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Congress Mohammed Arif Naseem Khan election petition against Shiv Sena MLA Dilip Lande, uddhav Thackeray pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.