शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

"मनकवड्या चंद्रकांत पाटलांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत…", सचिन सावंतांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 19:50 IST

Sachin Sawant : छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे.

ठळक मुद्देसारथी नावाला स्थापन झाली. मात्र आता तिची वाट लावून टाकली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील केला आहे. 

मुंबई : मराठा आरक्षण देण्याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाकडूनमराठा आरक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगत मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही, त्यामुळे मोदींना भेटून उपयोग होणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Congress Leader Sachin Sawant criticized BJP Leader Chandrakant Patil on Maratha Reservation )

"मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत – १. मोदींची विषयांची समज फार कमी आहे. २. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही. ३. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्या इतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे." असे सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांना नरेंद्र मोदींनी अद्याप भेटीसाठी वेळ दिली नाही. "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेला पत्र पाठवले. पण त्यांनी अद्याप मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही", असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी एकप्रकारे नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. याबाबत सोमवारी पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार)

'मराठा आरक्षण हा राज्याच्या सूचीतला विषय'मराठा आरक्षण हा राज्याचा सूचीमधील विषय आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली असेल. पण त्यात केंद्राची काहीच भूमिका नाही. म्हणूनच भेटून उपयोग होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिली. पुण्यात क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या कार्यक्रमात ते पत्रकारांसोबत बोलत होते.

'राज्य सरकारने सारथी संस्थेची वाट लावली'मराठा आरक्षण देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. आरक्षणाचा मुद्दा खूप वर्षांपासून चालतो आहे. सरकारला आरक्षण देण्याबाबत अनेक अडचणी आणि त्रासाला सामोरे जावे लागत होते. ते मिळत नसल्याने त्यावर मलमपट्टी होईल. म्हणून काही योजना चालू केल्या. त्यामध्ये सारथी संस्थेचाही समावेश होता. मात्र त्यानंतर सारथीचे नाव कुठेही दिसून आले नाही. सत्तेतील राजकीय नेते संस्थेबद्दल विचारणा केली असता. एकमेकांकडे बोट दाखवू लागले. सारथी नावाला स्थापन झाली. मात्र आता तिची वाट लावून टाकली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील केला आहे. 

'सकारात्मक निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा'शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे ५ तारखेला काढत असलेल्या मोर्चात आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा किंवा बॅच घेऊन सहभागी होणार नाही. पण एक नागरिक म्हणून पक्षातील सर्वजण सहभागी होणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत जे काही सकारात्मक आणि रचनात्मक निर्णय होतील. त्यात भाजपा पूर्णपणे ताकदीने उभे असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाcongressकाँग्रेस