Rahul Gandhi Video: राहुल गांधींच्या फिटनेसचा दम...पाहा फक्त ९ सेकंदात किती पुशअप्स मारले
By प्रविण मरगळे | Updated: March 1, 2021 15:47 IST2021-03-01T15:38:46+5:302021-03-01T15:47:02+5:30
Rahul Gandhi takes Push Up Challenge: काही दिवसांपूर्वी राहुल गांधी मच्छिमारांसोबत समुद्रात गेले होते, त्याठिकाणी मच्छिमारांनी त्यांच्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या

Rahul Gandhi Video: राहुल गांधींच्या फिटनेसचा दम...पाहा फक्त ९ सेकंदात किती पुशअप्स मारले
नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी(Congress Rahul Gandhi) सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत, राहुल गांधींनी सोमवारी कन्याकुमारीमध्ये रोड शो केला, पण त्यानंतर राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले, कन्याकुमारीत राहुल गांधींनी युवा विद्यार्थी-विद्यार्थिंनीसोबत संवाद साधला, त्यावेळी राहुल गांधी एका युवतीसोबत पुशअप करताना दिसून आले.( Rahul Gandhi takes part in a 'Push up challenge' by Merolin Shenigha, a 10th standard Judo enthusiast)
राहुल गांधींनी याठिकाणी मुलांसोबत संवाद साधला, यावेळी राहुल गांधी एका युवकासोबत आयकिडो करतानाही दिसले, आयकिडोनंतर राहुल गांधींना पुशअप करण्याची विनंती युवकांनी केली, त्यानंतर लगेच राहुल गांधींनीही व्यासपीठावर युवकांसोबत पुशअप केले. राहुल गांधींचा जो व्हिडीओ समोर आला, त्यात राहुल गांधी ९ सेकंदात १३ पुशअप्स मारताना दिसतात.
राहुल गांधींनी पुशअप केले त्यानंतर युवकांनी एका हाताने पुशअप्स करण्यास सांगितले, त्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा एका हाताने पुशअप करून दाखवले, राहुल गांधींना ज्या विद्यार्थिनीने पुशअप्स चॅलेंज दिले, ती दहावीत असून तिचं नाव मेरोलिन शेनिघा असं आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी वारंवार दक्षिणेकडील राज्यात दौरे करत आहेत. पुडुचेरी, केरळ आणि आता तामिळनाडू, या प्रत्येक दौऱ्यात राहुल गांधींचा नवा अवतार लोकांना पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी मच्छिमारांसोबत समुद्रात गेले होते, त्याठिकाणी मच्छिमारांनी त्यांच्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या, राहुल गांधी यांनी मच्छिमारांसोबत समुद्रात सफर केली, इतकचं नाही तर स्वत: समुद्रात उडी मारून मच्छिमारांसोबत पोहताना दिसून आले. यावेळी राहुल गांधींचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता, ज्यात राहुल गांधी सिक्स पॅक एब्स दाखवताना दिसत होते, सध्या राहुल गांधी यांच्या फिटनेस फंडा सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे, लोकंही त्यांच्या फिटनेसचं कौतुक करत आहेत.
In a lighter vein, Shri @RahulGandhi takes part in a 'Push up challenge' by Merolin Shenigha, a 10th standard Judo enthusiast.❣️#TNwithRahulGandhipic.twitter.com/qZIrCkk5nq
— All India Mahila Congress (@MahilaCongress) March 1, 2021
राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा
"मला रात्री फक्त ३० सेकंदांमध्ये झोप लागते. कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मोदींना वाटतं की ते तामिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत" असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(PM Narendra Modi) हल्लाबोल केला आहे.