येत्या काही दिवसांमध्ये आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडू शकतात. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. भाजपानं एकीकडे जोर लावण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे आता काँग्रेसही रिंगणात उतरली आहे. राहुल गांधी यांनि शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डिंग फिल्डमधून पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केली. त्यांनी आपल्या संबोधनादरम्यान आसामचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेते तरूण गोगोई यांच्या आठवणींना उजाळा देत कौतुक केलं. "अवैध इमिग्रेशनचा मुद्दा आहे. परंतु आसामच्या लोकांमध्ये तो सोडवण्याची क्षमता आहे. आसामला नुकसान झालं तर देशाचंही नुकसान होईल. काहीही झालं तर CAA येथे कधीही लागू होणार नाही. हम दो हमारे दो असलेल्या सरकारनं ऐकून घ्यावी या ठिकाणी कधीही CAA लागू होणार नाही," असं राहुल गांधी म्हणाले. "हम दो हमारे दो आणि बाकी सर्वांनी मरून जावं. हम दो हमारे दो... आसाम चालवत आहेत. आसाममध्ये जा, आग लावा, आणखी जे काही आसाममध्ये आहे ते लूटा. जे या ठिकाणी द्वेष पसरवण्याचं काम करतील त्यांना इकडची जनता आणि काँग्रेस मिळून योग्य धडा शिकवू," असंही ते म्हणाले. "काँग्रेस छोटे व्यापारी, कष्टकरी आणि गरीब लोकांचा पक्ष आहे, आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा एक गोष्ट होईल. जो द्वेष पसरवला जात आहे तो कमी होईल. आम्ही सर्व धर्म आणि जातीच्या लोकांचं संरक्षण करू. २००४ ते २०१४ या काळात भारताचा झपाट्यानं आर्थिक विकास झाला. कोट्यवधी लोकांना आम्ही गरीबीतून बाहेर काढलं. आम्ही तरूणांमधील भीती घालवून टाकू. आसाममधील बेरोजगारी आम्ही संपवू," असंही ते म्हणाले.
आसाममध्ये राहुल गांधी म्हणाले, "हम दो हमारे दो ऐकून घ्या, काहीही झालं तरी CAA ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 14:30 IST
Rahul Gandhi in Assam : अवैध इमिग्रेशनचा मुद्दा असला तरी तो सोडवण्याची ताकद आसामच्या लोकांमध्ये, राहुल गांधींचं वक्तव्य
आसाममध्ये राहुल गांधी म्हणाले, हम दो हमारे दो ऐकून घ्या, काहीही झालं तरी CAA ...
ठळक मुद्देअवैध इमिग्रेशनचा मुद्दा असला तरी तो सोडवण्याची ताकद आसामच्या लोकांमध्ये, राहुल गांधींचं वक्तव्यकाँग्रेसकडून आसाम वाचवा अभियानालाही सुरूवात