शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ पासून देशाला ग्रहण लागले; लोकशाहीच्या चारही स्तंभांचे स्वातंत्र्य धोक्यात- पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 08:50 IST

लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली असून त्यासाठी सर्वांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.

मुंबई : लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना मागील काही वर्षांत ही सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. २०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे. खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेले आज संविधान व्यवस्था बदलण्याचे काम करत आहेत. लोकशाहीच्या चारही स्तंभांचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली असून त्यासाठी सर्वांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. ते म्हणाले की, देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाच हजार वर्षे संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे; पण या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही त्या विचारसणीचे लोक सध्या सत्तेत आहेत. स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या ते करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले; परंतु आज ती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. तर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी झोकून देऊन लढा दिला. त्यांच्या निर्धारानेच आपल्याला आजचा हा दिवस पाहायला मिळत आहे.  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, याच मैदानातून १९४२ साली जुलमी इंग्रज राजवटीला ‘चले जाव’चा नारा दिला गेला. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत आज पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. आज देशातील मोदी सरकारचा अन्याय व अत्याचार पाहता ‘भाजप चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली आहे.ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. तसेच संविधान व देश वाचवण्यासाठी शपथ देण्यात आली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस