शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

Jitin Prasad: ... म्हणून काँग्रेससोबतचा तीन पिढ्यांचा संबंध तोडला; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 14:11 IST

Jitin Prasada joins BJP: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका; जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते. 

माझे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी (Congress) जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हमजे भाजपा. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत, असे काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले. (Delhi: Congress leader Jitin Prasada joins BJP in the presence of Union Miniter Piyush Goyal, at the party headquarters.)

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला

देशाच्या भविष्यासाठी, कठीण प्रसंगांत जर कोणता पक्ष आणि नेता उभा असेल तर ती भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर मी माझ्या लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही, तर अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असे मला काँग्रेसमध्ये वाटत होते. मी तिथे काहीच करू शकत नव्हतो. मला ज्या काँग्रेस नेत्यांनी आशिर्वाद दिला त्यांचा मी आभारी आहे, आता मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे प्रसाद म्हणाले. जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते. 

 उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh election) तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपाने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.

कोण आहेत जितिन प्रसाद, ज्यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मानला जातोय मोठा धक्का

अनिल बलूनी यांनी एक ट्विट केले....भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलूनी यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट केले आणि राजकीय चर्चांना उधान आले. त्यांनी आज एक मोठा नेता दुपारी 1 वाजता भाजपा मुख्यालयात पक्षप्रवेश करणार आहे. जितीन प्रसाद यांनी देखील 5 जूनला याचे संकेत दिले होते. योगी आदित्यनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशpiyush goyalपीयुष गोयल