शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

"उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यावर विभाजनाची आठवण आली..."; काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 22:12 IST

14th August : India's Partition Horrors Remembrance Day फाळणीवेळी हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देIndia's Partition Horrors Remembrance Day फाळणीवेळी हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला.

पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या आधीचा एक दिवस म्हणजेच १४ ऑगस्ट हा 'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून मानला जाणार असल्याची घोषणा केली. भारत-पाकिस्तान फाळणीची घटना ही वेदनादाई होती. तिरस्कार आणि हिंसाचारामुळे आमच्या लाखो बंधू भगिनींना विस्थापित व्हावे लागले होते. ही वेदना कधीही विसरता येणार नाही. अनेकांना प्राणही गमवावे लागले होते, असं मोदी यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसनं त्यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसनं यावर प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली, असं म्हणत पंतप्रधानांवर निशाणा साधला. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यावरून टीका केली आहे. "फूट पाडणारी फसवणूक उघड झाली. आता तुम्ही देशाला फसवू शकत नाही. २२ मार्चला पाकिस्तानचं अभिनंदन. आठवा २२ मार्च हा तो दिवस होता जेव्हा मुस्लीम लीगनं (२२ मार्च १९४०) विभाजनाचा प्रस्ताव पारित केला होता. गेल्या १४ ऑगस्ट रोजीही पाकिस्तानचं अभिनंदन. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यानंतर विभाजनाची आठवण झाली. वाह साहेब," असं म्हणत सुरजेवाला यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यांनी आपल्या ट्वीटसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही ट्वीटही शेअर केले आहेत.  काय म्हणाले होते मोदी ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटलं की, फाळणीमध्ये विस्थापित व्हावं लागलेल्या आणि प्राण गमावलेल्या आमच्या लाखो बंधु-भगिनींच्या बलिदानाला लक्षात ठेवण्यासाठी आजचा दिवस  'फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस' म्हणून मानला जाईल. आजचा हा दिवस, #PartitionHorrorsRemembranceDay आम्हाला भेदभाव, वैमनस्य आणि वाईट भावनांच्या विषाला संपविण्यासाठी केवळ प्रेरितच करणार नाही, तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावनेनं आणि मानवी संवेदनांना आणखी मजबूत करणार आहे, असं मोदी म्हणाले. (14th August : India's Partition Horrors Remembrance Day)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकIndiaभारत