शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या कोपरकरांचा अर्ज मागे; विधान परिषदेसाठीच्या दोन जागांसाठी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 12:25 IST

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज  असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे मानले जात होते.

मुंबई  : विधान परिषदेसाठी मुंबई महापालिका मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे काँग्रेस पदाधिकारी सुरेश कोपरकर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दोन जागांसाठीच्या या निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज  असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे मानले जात होते. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवार घोषित केले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होऊन फोडाफोडीचा खेळ रंगण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संख्याबळ नसताना काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून उमेदवारी आल्याने महाविकास आघाडीतील इतर पक्ष विशेषत: शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

- मुंबई काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही कोपरकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. या पार्श्वभूमीवर कोपरकर यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. अखेर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची विशेष बैठक झाली. यात कोपरकरांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय झाला. - त्यानुसार गुरुवारी सायंकाळी कोपरकर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे सिंह आणि शिवसेनेचे शिंदे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना