शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कर्नाटकमध्ये काँग्रेस, जेडीएसचा 'धुव्वा'; ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 2:01 PM

Karnatak Gram Panchayat Election Result: गेल्या वर्षी झालेल्या सत्तासंघर्षात काँग्रेस, जेडीएसची सत्ता उलथवून भाजपाने मुख्यमंत्रीपद मिळविले होते. यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.

एकीकडे महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणे, पॅनल उभे करणे आदीची लगबग सुरु असताना शेजारील कर्नाटकमध्ये आज 5,762 ग्राम पंचायतींवर कोणाचे राज्य असणार य़ाचा निकाल सुरु झाला आहे. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ही लढत चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

22 आणि 27 डिसेंबरला मतदान झाले होते. काँग्रेस, जेडीएसकडून सत्ताखेचून आणलेल्या सत्ताधारी भाजपाने दोन्ही विरोधकांना धोबीपछाड देत 80 टक्के ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्याची योजना बनविली होती. आजच्या निकालाच्या सुरुवातीच्य़ा कलानुसार 80 टक्के ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचे दिसत नसले तरीही भाजपाच वरचढ ठरल्याचे दिसत आहे. 

भाजपा 3,865, काँग्रेस 1,988 आणि जेडीएस 1,030 जागांवर पुढे आहे. सुरुवातीपासूनच भाजपाने मोठी उसळी घेतलेली आहे. राज्यात एकूण 6,004 ग्रामपंचायती आहेत. मात्र, कायदेशीर कारणांमुळे 242 ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. एकूण 94,348 जागांसाठी 2.8 लाख उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी सांगितले की, 85 ते 90 टक्के भाजप आणि समर्थक उमेदवार जिंकतील. काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली होती. मात्र, ग्राम पंचायत सदस्य़ाची सीट मिळविण्यासाठी काही ठिकाणी उमेदवारांकडून २ ते 12 लाख रुपये देवस्थान, गावाच्या विकासासाठी देण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. आज मतदान होत असले तरी निकाल उद्याच जाहीर होतील असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या सत्तासंघर्षात काँग्रेस, जेडीएसची सत्ता उलथवून भाजपाने मुख्यमंत्रीपद मिळविले होते. यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, काँग्रेस, जेडीएसने एकत्र येत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. अखेर काँग्रेस त्रास देत असल्याचे सांगत कुमारस्वामींनी अश्रू गाळले होते. यानंतर भाजपाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडत नाराजीनाट्य घडविले होते. या आमदारांना मुंबईत आणून ठेवले होते.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक