शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाच्या जाणिवेतून काँग्रेसने न्याय योजना आणली; मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 03:42 IST

१९८४ मध्ये झालेल्या शिख विरोधी दंगली, दलितांच्या विरोधीतील हिंसाचार, भोपाळ गॅस पीडितांच्याबाबत न्याय कोण करणार, असा प्रश्न विचारला आहे.

थेनी (तामिळनाडू) : अन्याय केल्याची जाणीव झाल्यानेच काँग्रेसने न्याय योजना जाहीर केल्याची टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात १९८४ मध्ये झालेल्या शिख विरोधी दंगली, दलितांच्या विरोधीतील हिंसाचार, भोपाळ गॅस पीडितांच्याबाबत न्याय कोण करणार, असा प्रश्न विचारला आहे.तामिळनाडूतील थेनी आणि रामानंथपूरम येथे झालेल्या निवडणुक रॅलीत मोदी यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस आणि बेईमानी यांची खास दोस्ती आहे, परंतु कधी-कधी चुकीने का होईना, ते वास्तव सांगून जातात. अब न्याय होगा या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या मोहिमेतच त्यांनी हे मान्य केले आहे की, गेली ६0 वर्षे त्यांनी अन्यायच केला आहे. शिख विरोधी, दलित विरोधी हिंसाचाराबाबत कोण न्याय करणार, असा प्रश्न मोदी यांनी विचारला. तामिळनाडूला समृद्ध बनविण्यासाठी द्रमुक आणि काँग्रेसचे खेळ बंद करून टाका, भ्रष्ट परिवारातील घराणेशाहीचे शासन संपवून टाका, असे आवाहन करून मोदी यांनी श्रीलंकन तमिळ बंधूंच्या समृद्धीसाठी काम करणे सुरू ठेवू, असे सांगितले. या सभेत मुख्यमंत्री के. पालनीस्वामी यांनीही काँग्रेस आणि द्रमुक पक्षांच्या आघाडीवर टीका केली. काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या राज्यातील आघाडीवरून शेजारच्या केरळ राज्यात एकमेकांविरोधात हे पक्ष काय भूमिका घेणार, असा प्रश्न त्यांनी केला.

वडील अर्थमंत्री होते, तेव्हाच मुलानेही देश लुटला अशी टीका नाव न घेता करत, मोदी यांनी द्रमुक, काँग्रेस आणि महाभेसळीत समाविष्ट असलेल्या पक्षांना जगाच्या नकाशावर भारताची झालेली प्रगती सहन होत नाही. जे एकमेकांचे शत्रू होते, त्यांनीच आता हातमिळविणी केली आहे. द्रमुकच्या प्रमुखांनी काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्षांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ केला होता, परंतु आता एक झालेल्या विरोधकांना ते मान्य नव्हते, कारण ते प्रत्येक जण स्पर्धेत होते. या पक्षाने दक्षिणेतील सहकारी पक्षांचा अपमान केला होता, त्यांना द्रमुक पक्ष नको होता, असा आरोपही मोदी यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीTamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019