शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काँग्रेस हायकमांडकडून जी-२३ ला वेसण घालण्याची तयारी, गुलाम नबी आझादांबाबत घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:04 IST

Ghulam Nabi Azad : काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे.

ठळक मुद्देगुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील प्रमुख नेते गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर होत असलेले काँग्रेसचे पतन रोखण्यासाठी काँग्रेसकडून संघटनात्मक सुधारणांची मागणी या गटाकडून करण्यात आली आहेया गटातील नेत्यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्षनेतृत्वाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे

नवी दिल्ली - काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे. दरम्यान, जी-२३ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाला वेसण घालण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केली आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस नेतृत्वाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी गुलाम नबी आझाद यांचा समावेश आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत केलेला नाही.  मात्र जी-२३ च्या गटात असलेल्या नेत्यांपैकी मनीष तिवारी आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या पुत्राला स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्या माध्यमातून या नेत्यांच्या गटामध्ये फूट पाडण्याची तयारी काँग्रेस नेतृत्वाने केली आहे.  (Congress high command prepares to encircle G-23, takes big decision regarding Ghulam Nabi Azad)

गुलाम नबी आझाद हे काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांच्या गटामधील प्रमुख नेते आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर होत असलेले काँग्रेसचे पतन रोखण्यासाठी काँग्रेसकडून संघटनात्मक सुधारणांची मागणी या गटाकडून करण्यात आली आहे. तसेच या गटातील नेत्यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्षनेतृत्वाच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.  काही दिवसांपूर्वी २८ फेब्रुवारी रोजी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत भूपेंद्र हुड्डा, मनीष तिवारी, राज बब्बर, कपिल सिब्बल यांच्यासह काही नेत्यांनी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यानंतर गुलाम नबी आझाद आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेसच्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटली ह्या जम्मू काश्मीरच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत.  त्यांच्याकडून जम्मू काश्मीरमधील गुलाम नबी आझाद यांचा प्रभाव कमी करण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका सुरू आहेत.  

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारण