शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

"दहा लाखांचा सूट घालून गांधीजींचे नाव घेणे हाच मुळात विरोधाभास"; काँग्रेस प्रभारींची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:47 IST

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष चौथ्या नंबरवर गेलाच कसा, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मी आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहात आहे. मात्र, आम्हाला खूप काम करावे लागेल. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार - एच के. पाटील

अतुल कुलकर्णी मुंबई : ‘साधी राहणी उच्च विचार’ या महात्मा गांधींच्या विचाराला आणि साधेपणाला देशाने गौरवले. आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. सामान्य माणूस त्यांच्या जवळ सहजपणे जाऊ शकत होता. एक धोती आणि पंचा घालून फिरणाऱ्या या साध्या माणसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा लाखाचा सट घालून फिरतात. ही देशाला शोभा देणारी गोष्ट नाही, असाथेट हल्ला काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच. के. पाटील यांनी केला आहे.

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, महात्मा गांधींच्या आयुष्याशी तुलना करताना जाणवणारा हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही ‘स्वच्छ भारत अभियानात’ गांधीजींचा चष्मा वापरतो. त्यांच्या काठीचाही वापर प्रतीकात्मकरीत्या करतो. कृती मात्र भलतीच करतो. हा मोठा विरोधाभास आहे.

‘स्वच्छ भारत अभियान’ हा काही नवीन कार्यक्रम नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘निर्मल भारत’ची कल्पना मांडली. त्यात मोठे काम केले. पण मोदी सरकारने पुढे त्याचे नाव बदलून ‘स्वच्छ भारत अभियान’ केले. नाव बदलले तरी चालेल पण देशात त्यासाठी काम झाले पाहिजे. कर्नाटकात ग्रामविकास आणि पंचायत राज या विभागाचे मंत्री असताना आपल्याला सलग चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारमिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रामीण विकासाला आपण पुरस्काराच्या कोणत्या टप्प्यावर बघता?ग्रामीण विकासासाठी सुरुवातीला जी कामे झाली, ती योग्य होती. मात्र पुढे ग्रामीण विकासाचा संपूर्ण फोकस बदलला. ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांना केंद्राने जो निधी द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. अनेक योजनांना मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे जे काम व्हायला हवे होते ते ही झाले नाही.

केंद्र सरकारने काँग्रेसच्या विफलतेचे प्रतीक म्हणून मनरेगा योजना चालू ठेवणार, असे सांगितले होते. आज त्याच मनरेगासाठी केंद्राने लॉकडाऊन नंतर चाळीस हजार कोटीची तरतूद केली. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?मनरेगा हा केवळ देशाचा नाही तर जगाने कौतुक करावे असा मोठा कार्यक्रम आहे. जगभरात मनरेगाची वेगवेगळ्या पद्धतीने कॉपी केली गेली. कोणीही जगात आजपर्यंत या कार्यक्रमावर टीका केली नाही. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या कल्पनेतून आम्ही मनरेगा ला आकाराला आणले होते. ग्रामीण विकास हे आमचे स्वप्न होते. अभिमानाने लक्षात ठेवावी, अशी मनरेगाची योजना आहे. त्यावर टीका करण्यापेक्षा ती चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे.

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचा विषय चर्चेत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील ती भूमिका घेतली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल असे सांगितले आहे. यावर निर्णय कधी होणार?प्रदेशाध्यक्षपदाचा विषय अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिला आहे. मी पुढच्या वेळी मुंबईत येईन तेव्हा महाराष्ट्रातल्या नेत्यांशी चर्चा करेन. त्यांची मतं समजून घेईन. त्यानुसार वरिष्ठांशी चर्चा करेन आणि त्यावर तात्काळ निर्णय घेतला जाईल.

महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या नंबर वर आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही. कार्यकर्त्यांपेक्षा नेते जास्त दिसत आहेत. मुंबई काँग्रेस पूर्णपणे अस्तित्वहीन झाली आहे. या प्रश्नांना आपण कसे तोंड देणार?महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष चौथ्या नंबरवर गेलाच कसा, हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मी आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहात आहे. मात्र, आम्हाला खूप काम करावे लागेल. कोणीतरी हरला म्हणून मी जिंकलो ही वृत्ती सोडून द्यावी लागेल. कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावे लागतील. त्यासाठी मेहनत करावी लागेल. महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. हे काम येत्या काही महिन्यात वेग घेताना दिसेल.

कर्नाटक आणि महाराष्ट्रात जलसिंचनावरून काही वादाचे मुद्दे आहेत. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून मतभिन्नता आहे. यावर आपली भूमिका काय असेल?कर्नाटक महाराष्ट्रात जास्त वादाचे मुद्दे राहिलेले नाहीत. बच्छावत अ‍ॅवॉडनंतर जवळपास सगळे मुद्दे संपले आहेत. अलमट्टी धरणाच्या उंची विषयी बच्छावत अवॉर्ड आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात बदल होणार नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. पाणीप्रश्नावर आमचे वाद आंध्रप्रदेश आणि तेलंगणासोबत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस