नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणात काँग्रेसही उतरली, दि. बां. च्या नावासाठी प्रयत्न करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:19 AM2021-05-27T09:19:01+5:302021-05-27T09:19:35+5:30

Navi Mumbai airport News: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे.

Congress also got involved in naming Navi Mumbai airport | नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणात काँग्रेसही उतरली, दि. बां. च्या नावासाठी प्रयत्न करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन

नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणात काँग्रेसही उतरली, दि. बां. च्या नावासाठी प्रयत्न करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन

Next

 
पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेले काम अतुलनीय असेच आहे. आमच्या पिढीचे ते आदर्श होते. त्यांचे नाव नवी मुंबईतीलविमानतळाला देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्या सर्वपक्षीय कृती समितीची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबईविमानतळ सर्वपक्षीय कृती समितीला दिले.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. यासाठी रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर यांसह अनेक जिल्ह्यांत मोठी चळवळ उभी राहात आहे. त्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातले एक निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी पटोले यांनी या शिष्टमंडळाला आश्वासित केले. 

कृती समितीचे अध्यक्ष, शेतकरी नेते दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भेटलेल्या या शिष्टमंडळात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कार्यकारिणी सदस्य जे. एम. म्हात्रे, ओबीसी नेते जे. डी. तांडेल, कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे, संतोष केणे, मेघनाथ म्हात्रे आणि जासई ग्रामस्थांचे इतर प्रतिनिधी आदींचा समावेश होता. 

Web Title: Congress also got involved in naming Navi Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.