शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत कौर राणा यांच्या रोड शोमध्ये धक्काबुक्की 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 15:51 IST

महाआघाडीचे उमेदवार प‍ार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज लोणावळा शहरात सिने अभिनेत्री नवनीत कौर राणा यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.

पुणे  : महाआघाडीचे उमेदवार प‍ार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज लोणावळा शहरात सिने अभिनेत्री नवनीत कौर राणा यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडल्याने काही पदाधिकारी रॅली अर्धवट सोडून निघून गेले.

प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरात आज सकाळी दहा वाजता नवनीत कौर राणा यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. मात्र साडेबारा वाजेपर्यत राणा न आल्याने रॅलीच्या ठिकाणी आलेल्या पुणे जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अर्चना शहा यांचाच रोड शो सुरु करण्यात आला. काही अंतर चालून गेल्यावर हा रोड शो थांबवत पुन्हा राणा यांची वाट पाहण्यात आली. दरम्यान शिवाजी महाराज चौकत दाखल झालेल्या नवनीत राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रोड शो ला सुरुवात केली. मात्र यावेळी काँग्रेसच्या शहा व इतर मंडळींना बाजुला सारत राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे केवळ राणा यांनाच घेऊन चालू लागल्याने महिला पदाधिकारी व काँग्रेस पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी एकमेकाच्या पुढे जाण्याकरिता धक्काबुक्की झाल्याने काँग्रेसने तसेच राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी रोड शो अर्धवट सोडत माघारी जाणे पसंद केल्याने हा रोड शो फ्लाॅप शो झाल्याची शहरात चर्चा रंगली होती.

 फोटो ट्रोल करुन काही होत नाही - राणा 

प्रतिस्पर्धी उमेदवाराचे फोटो ट्रोल करुन काही होणार नाही. पार्थ पवार, अजित पवार यांच्यात दम आहे म्हणून ते बाहेर पडून निवडणूक लढवत आहेत. लोकांचे मत मिळविण्याचा दम त्यांच्यात आहेत. पुढिल 23 तारखेला विजयाची मोठी मिरवणूक आम्हीच काढणार असे नवनीत कौर राणा यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparth pawarपार्थ पवारlonavalaलोणावळा