शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शपथपत्रे, कागदपत्रे सादर करा; अनिल देशमुख, परमबीर सिंगांसह ५ जणांना आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 08:49 IST

सचिन वाझे, पाटील, पलांडेंचाही समावेश, कामकाज कसे असेल याची नियमावली जारी 

यदु जोशीमुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. कैलाश चांदीवाल आयोगाने देशमुख, परमबीर सिंग, सचिन वाझेंसह पाच जणांना ११ जूनपर्यंत शपथपत्रे व कागदपत्रे सादर करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे.

नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये एसीपी संजय पाटील आणि अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांचाही समावेश आहे. या सगळ्यांची शपथपत्रे आणि कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांना समितीसमोर बोलविण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आहे.परमबीर सिंग यांनी २० मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीसंदर्भात आरोप केले होते. त्याची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चांदीवाल आयोग स्थापन केला आहे.

चांदीवाल समितीने एक नियमावली तयार केली आहे. त्यानुसार, कागदपत्रे सादर करण्यास, साक्षीदार आणण्यास किंवा केसची तयारी करण्यासाठी मुदत दिली जाणार नाही. वकील गैरहजर आहेत, आदी  कारणांवरूनही मुदत दिली जाणार नाही. चौकशीचे काम कागदपत्रे वा प्रतिज्ञापत्रांच्या आधारे करायचे की तोंडी पुरावे घ्यायचे, याचा निर्णय आयोग करेल.

कार्यालय दिले, पण सुविधा नाहीतमंत्रालयाजवळील जुने सचिवालय इमारतीत न्या. चांदीवाल आयोगाला कार्यालय देण्यात आले आहे. मात्र, शासनाकडून अद्याप सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. आयोगाने त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसsachin Vazeसचिन वाझे