शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींसोबत 'ती' भेट झाली का?; नातं तुटलं नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचं 'शरीफ' उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 13:59 IST

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दिल्लीत व्यक्तीगत बैठक; ३० मिनिटं चर्चा

नवी दिल्ली: मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. जवळपास दीड तास ही बैठक सुरू होती. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधानांची बैठक झाली. या भेटीसोबतच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात व्यक्तीगत स्वरुपाची भेट झाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होती. त्याबद्दल पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. त्यावर 'आम्ही बराच काळ एकत्र होतो. सत्तेत सोबत नाही याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. अशा भेटीत काहीच गैर नाही. मी काही नवाज शरीफांना भेटलेलो नाही. आपल्या पंतप्रधानांना भेटलो आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाचा विषय निश्चितपणे सोडवतील; भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्तमराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्लीत पंतप्रधानांना भेटलं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा होता. त्यात मोदी आणि ठाकरेंमध्ये वैयक्तीक भेट होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अजित पवारांसोबत पहाटे घेतलेली शपथ आपली चूक होती, अशी कबुली थोड्याच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यामुळे मोदी-ठाकरेंच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस