शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी ३ जणांची यादी पाठवली; राज्यपाल घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 07:19 IST

MPSC रिक्त सदस्यांसाठी राज्यपालांकडे आता आणखी एक यादी, ३१ जुलैपूर्वी नियुक्त करण्याचे दिले होते उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन

ठळक मुद्देमुलाखतीच्या विलंबामुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याचे पडसाद विधानसभेत उमटले होतेएमपीएससीमार्फत भरतीची सक्षम व गतिमान व्यवस्था निर्माण केली जाईलतीन पदांसाठी तीन नावे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली आहेत

यदु जोशी

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरण्यात येतील, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, तीन सदस्यांची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले होते. त्या वेळी एमपीएससीमार्फत भरतीची सक्षम व गतिमान व्यवस्था निर्माण केली जाईल. ३१ जुलैपूर्वी एमपीएससी सदस्यांची रिक्त पदे भरण्यात येतील, असे पवार यांनी विधानसभेत जाहीर केले होते. 

सूत्रांनी सांगितले की, तीन पदांसाठी तीन नावे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली आहेत. राज्यपाल या नावांना कधी मान्यता देतात याबाबत उत्सुकता आहे. सदस्य पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. एमपीएससी सदस्य पदासाठीच्या पात्रतेचे निकष ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन आदेशात दिलेले आहेत. त्या आधारे ही छाननी करून एका पदासाठी चार नावांची शिफारस मुख्य सचिवांची  समिती मुख्यमंत्र्यांकडे करते व नंतर मुख्यमंत्री त्यातील एक नाव राज्यपालांकडे पाठवतात. या वेळी तीन सदस्यांसाठीची तीन नावे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठविल्याचे कळते. एमपीएससीचे अध्यक्ष सतीश गवई हे पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल.

शासनाच्या परवानगीची MPSC ला प्रतीक्षागट ‘ब’च्या अधिकाऱ्यांची पदभरती करण्यासाठी संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा घेण्याकरिता परवानगी द्या, असे पत्र मे २०२१ मध्ये आणि त्यानंतरही एकदा एमपीएससीने राज्य सरकारकडे पाठविले. मात्र, अद्याप शासनाने परवानगी दिलेली नाही. महामारीच्या कायद्यानुसार परीक्षा घेण्यासाठी शासनाची परवानगी लागते. गट ‘ब’च्या अधिकारी पदासाठी ४ लाख उमेदवारांचे अर्ज आलेले होते. 

२०२० च्या पदभरतीचे मागणीपत्रच नाहीएमपीएससीने कोणत्या आणि किती पदांची भरती प्रक्रिया राबवायची याचे मागणीपत्र राज्य शासनाकडून दरवर्षी येते. २०२० मधील पदभरतीचे मागणीपत्र अद्याप शासनाकडून एमपीएससीला गेलेले नाही. एमपीएससीने त्याबाबत दोनवेळा सरकारकडे विचारणा केली. दरवर्षी साधारणत: सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान शासनाकडून मागणीपत्र येत असते. मात्र आता ऑगस्ट आला तरी गेल्या वर्षीचे मागणीपत्र शासनाकडून गेलेले नाही.

जीआर म्हणतो, १५ सप्टेंबर!

शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत विविध विभागांनी एमपीएससीकडे पाठवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी एका बैठकीत दिले होते. मात्र, ३० जुलै रोजी शासन आदेश काढण्यात आला की, ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी पदभरतीबाबतची मागणी पत्रे एमपीएससीकडे पाठवावीत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMPSC examएमपीएससी परीक्षा