शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

Bhagat Singh Koshyari: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चार दिवस वेटिंगवर?; राज्यपाल डेहराडून दौऱ्यावर, भेट लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 11:25 IST

CM Uddhav Thackreay want to meet governor Bhagatsingh koshyari in Parambir singh allegation on Anil Deshmukh: राज्यात मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सचिन वाझेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची उचलबांगडी करण्य़ात आली होती. यामुळे नाराज झालेल्या परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबई परिसरातील सुमारे 1700 पब, बार यांच्याकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्य़ास सांगितल्याच खळबळजनक आरोप केला होता. यावर विरोधी पक्षांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

महाराष्ट्रात लक्ष घालावे, राज्य वाचवावे अशी विनंती करत ठाकरे सरकारची 100 प्रकरणे विरोधी पक्षनेत्यांनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांच्यासमोर मांडली होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackreay) यांना बोलते करावे, अशी मागणीदेखील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली होती. यावर आज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भवनाकडून वेळ देण्यात आलेली नाही. (CM Uddhav thackreay cant meet governor Bhagatsingh koshyari today.)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजपासून 28 मार्चपर्यंत डेहराडूनच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे राज्यपाल भवनाकडून कोणालाही वेळ देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यपाल भेट टळणार आहे. राज्यपाल डेहराडूनहून परत आल्यानंतर त्यांना भेट दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल 28 मार्चला तेथून परतणार आहेत. राज्यपालांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. 

राज्यात मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सचिन वाझेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची उचलबांगडी करण्य़ात आली होती. यामुळे नाराज झालेल्या परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबई परिसरातील सुमारे 1700 पब, बार यांच्याकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्य़ास सांगितल्याच खळबळजनक आरोप केला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला होता. याची झळ केंद्रापर्यंत जाणवली होती. गृहमंत्री राष्ट्रवादीचे असल्याने आणि राज्यात शिवसेनेला पाठिंबा दिलेला असल्याने लोकसभा आणि राज्यसभेत याचे पडसाद उमटले होते. 

विरोधकांची काय मागणी होती....विरोधी पक्षनेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली होती. पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी वापरण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी(police) वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. अधिकाऱ्यांमध्ये आतंक आहे. त्यांना बदलीची आणि कारवाईची भीती दाखविली जात आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट आहे अशी या ठाकरे सरकारची 100 प्रकरणे राज्यापालांना दिल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  जे गोपनिय अहवाल सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यपालांना भेटून आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. 

परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी चौकशी आयोगबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हे चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा