Bhagat Singh Koshyari: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चार दिवस वेटिंगवर?; राज्यपाल डेहराडून दौऱ्यावर, भेट लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:23 AM2021-03-25T11:23:06+5:302021-03-25T11:25:30+5:30

CM Uddhav Thackreay want to meet governor Bhagatsingh koshyari in Parambir singh allegation on Anil Deshmukh: राज्यात मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सचिन वाझेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची उचलबांगडी करण्य़ात आली होती. यामुळे नाराज झालेल्या परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबई परिसरातील सुमारे 1700 पब, बार यांच्याकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्य़ास सांगितल्याच खळबळजनक आरोप केला होता. यावर विरोधी पक्षांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

Chief Minister Uddhav Thackeray on four days waiting?; Governor on tour on Dehradun, visit extended | Bhagat Singh Koshyari: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चार दिवस वेटिंगवर?; राज्यपाल डेहराडून दौऱ्यावर, भेट लांबणीवर

Bhagat Singh Koshyari: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चार दिवस वेटिंगवर?; राज्यपाल डेहराडून दौऱ्यावर, भेट लांबणीवर

Next

महाराष्ट्रात लक्ष घालावे, राज्य वाचवावे अशी विनंती करत ठाकरे सरकारची 100 प्रकरणे विरोधी पक्षनेत्यांनी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांच्यासमोर मांडली होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackreay) यांना बोलते करावे, अशी मागणीदेखील भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली होती. यावर आज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भवनाकडून वेळ देण्यात आलेली नाही. (CM Uddhav thackreay cant meet governor Bhagatsingh koshyari today.)


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजपासून 28 मार्चपर्यंत डेहराडूनच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे राज्यपाल भवनाकडून कोणालाही वेळ देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यपाल भेट टळणार आहे. राज्यपाल डेहराडूनहून परत आल्यानंतर त्यांना भेट दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल 28 मार्चला तेथून परतणार आहेत. राज्यपालांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. 


राज्यात मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सचिन वाझेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची उचलबांगडी करण्य़ात आली होती. यामुळे नाराज झालेल्या परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबई परिसरातील सुमारे 1700 पब, बार यांच्याकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्य़ास सांगितल्याच खळबळजनक आरोप केला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला होता. याची झळ केंद्रापर्यंत जाणवली होती. गृहमंत्री राष्ट्रवादीचे असल्याने आणि राज्यात शिवसेनेला पाठिंबा दिलेला असल्याने लोकसभा आणि राज्यसभेत याचे पडसाद उमटले होते. 


विरोधकांची काय मागणी होती....
विरोधी पक्षनेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली होती. पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी वापरण्याऐवजी पक्षाच्या वसुलीसाठी(police) वापरले जात आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. अधिकाऱ्यांमध्ये आतंक आहे. त्यांना बदलीची आणि कारवाईची भीती दाखविली जात आहे. राज्यामध्ये भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट आहे अशी या ठाकरे सरकारची 100 प्रकरणे राज्यापालांना दिल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  जे गोपनिय अहवाल सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यपालांना भेटून आल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. 


परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी चौकशी आयोग
बईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हे चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील. 

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray on four days waiting?; Governor on tour on Dehradun, visit extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.