मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतले काही कळत नाही; चंद्रकांत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 06:54 IST2020-10-13T02:45:40+5:302020-10-13T06:54:35+5:30

BJP Chandrakant Patil, CM Uddhav Thackeray News: ट्रॅक्टर यात्रा काढून कृषी कायद्यांचे जल्लोषात स्वागत

Chief Minister Uddhav Thackeray does not know anything about agriculture; Criticism of Chandrakant Patil | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतले काही कळत नाही; चंद्रकांत पाटील यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतले काही कळत नाही; चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फक्त खुर्ची महत्त्वाची आहे. त्यांना शेतीमधले काहीही कळत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली.

दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून या तीन कृषी कायद्याचे स्वागत करण्यात आले. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राहुल गांधींनी ट्रॅक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांना शेती म्हणजे काय हेच समजत नाही. काहीं दिवसांपूर्वी या कायद्याला पाठिंबा देणाºयांना दिल्लीवरुन मॅडमचा रेटा आल्याने केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. कायद्याला स्थगिती देता येत नाही. मुळातच ठाकरेंना कायदा कळतो का, हा प्रश्न आहे. ते या कायद्याला स्थगिता का देत आहेत? सेस गोळा करणे बापाची पेंड आहे काय, असा सवाल करून पाटील म्हणाले, कृषि उत्पन बाजार समितीला केवळ सेस गोळा करण्याचे काम आहे. सेस बंद होणार असल्यानेच यांच्या पोटात दुखत आहे.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray does not know anything about agriculture; Criticism of Chandrakant Patil