शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत होणाऱ्या अंतर्गत पक्षांतराबाबत छगन भुजबळ यांचे मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:57 IST

Chhagan Bhujbal News : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे.

नाशिक - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात केलेल्या सत्तास्थापनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीने आपले बळ दाखवून दिले आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधून परस्परांमध्ये होत असलेल्या पक्षांतरामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील स्थानिक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्याच्या घटनांमुळे उदभवलेल्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षातील स्थानिक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणार असल्यास त्याबाबत तिन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठीच मिळून निर्णय घेतील.दरम्यान, पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि नंतर विविध शहरांत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे सध्या भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस