शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

पालकमंत्री बदलणे म्हणजे पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे आहे का..? सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 18:38 IST

जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात ते किती सक्रिय होते हे पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले आहे

कोल्हापूर - पालकमंत्री बदलणे म्हणजे पेट्रोल पंपावरील माणूस बद्दलण्याइतके सोपे आहे का अशी विचारणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात ते किती सक्रिय होते हे पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले आहे असा टोलाही त्यांनी भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. युवक काँग्रेसने महाडिक यांच्या दारात शुक्रवारी आंदोलन केल्यानंतर त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोरोनाचे संकट थोपवण्यात अयशस्वी ठरलेल्या निष्क्रिय पालकमंत्र्यांना बदलून त्याऐवजी कामाची धडाडी असलेल्या हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करावे असे त्यांनी म्हटले होते..त्यास पालकमंत्री पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.सतेज पाटील म्हणाले, युवक काँग्रेसचे आंदोलन राज्यव्यापी होते. ते महाडिक यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दारातही करण्यात आले पण त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. महाडिक मात्र संतापले कारण आपल्यावर भाजपचा शिक्का बसला तर अन्य पक्षात जाण्याचे दरवाजे बंद होतील अशी भीती त्यांना वाटते.भाजपने त्यांना साखर कारखाना अभ्यास समितीचे पद दिले आहे पण ज्यांच्या स्वतःच्या कारखान्यावर ३०० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे व जो कारखाना तीन हंगाम घेऊ शकलेला नाही अशा कारखान्याचे प्रमुख इतर कारखान्याचे प्रश्न काय मांडणार अशी खिल्ली पालकमंत्री पाटील यांनी उडवली.महाडिक यांच्याकडून कौतुकभाजपचे असूनही धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडीतील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाचे कौतुक केले याचा आम्हांला आनंद असल्याची प्रतिक्रियाही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली..

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण