शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 17:31 IST

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असून, १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय, असा थेट सवाल विचारला आहे.

बुलढाणा: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच एका सर्व्हेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील टॉप-५ मध्ये असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते. यावरूनही भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असून, १४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय, असा थेट सवाल विचारला आहे. (chandrashekhar bawankule question how can a cm who has not been in the ministry for 14 months be excellent)

Vi चे आता BSNL मध्ये विलिनीकरण होणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका

माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री १४ महिने मंत्रालयात आले नाहीत. मात्र, तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता, अशी विचारणा केली आहे. उद्धव ठाकरेंना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणाणारा सर्व्हे कुणी केला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक विकासाची कामे केली, असेही बावनकुळे म्हणाले.

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

राज्यातील जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण 

राज्यातील १२ कोटी जनतेला विचारा, उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण ते, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा टोला राणे यांनी लगावला.

“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका

दरम्यान, मागील महिन्यात प्रश्नम या संस्थेने आपल्या त्रैमासिक अहवाल जाहीर केला होता. त्यात देशातील १३ राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले. प्रश्नमकडून देशातील १३ राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचे मत नोंदवले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना