कोल्हापूर : झोपेत सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांत पाटील कोम्यात आहेत असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.झोपेत सरकार पडेल असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते, त्याबद्दल हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले दादा कोम्यात आहेत, गेले १८ महिने सरकार सुरळीत चालले आहे, हे दादांना दिसत नाही का. मला वाटते, दादांना केवळ आरोप करायचे काम दिले आहे. आजच सचिन सावंत यांच्यावरही त्यांनी आरोप केले आहेत.मराठा समाजाला आरक्षणाविषयी विचारले असता मुश्रीफ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आमचे सरकार स्वस्थ बसणार नाही. ते म्हणाले. भाजपपासून सावध राहा, एका बाजूला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करायचे, टिकणारे आरक्षण मिळू द्यायचे नाही आणि दुसरीकडे मराठा समाजात गैरसमज पसरवून आंदोलनासाठी उचकवणे असे काम भाजपचे सुरु आहे, असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केला आहे.
झोपेत सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांत पाटील कोम्यात आहेत : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:03 IST
Politics kolhapur : झोपेत सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांत पाटील कोम्यात आहेत असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
झोपेत सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांत पाटील कोम्यात आहेत : हसन मुश्रीफ
ठळक मुद्देझोपेत सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांत पाटील कोम्यात आहेत : हसन मुश्रीफ१८ महिने सरकार सुरळीत, मराठा आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही