शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 19:59 IST

Sachin Sawant : भाजपाच्या मॉडेलमधला हा मोहरा अडचणीत आल्याने, त्याची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेल्याने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रकाश जावडेकर हे त्याच्या मदतीसाठी धडपड करत आहेत, असे सचिन सावंत म्हणाले.

ठळक मुद्देबिहारच्या निवडणुकीत काही काळ मुखभंग होण्याचे टाळण्यासाठी एम्स पॅनलचा रिपोर्ट नाकारण्याकरता सीबीआयवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सचिन सावंत म्हणाले.

मुंबई : मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याने लोकशाही विरोधातील कट उघडकीस आला आहे. यातून लोकशाही किती संकटात आहे ते स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ कमजोर करण्याचे हे कारस्थान आहे. फ्रॉड पद्धतीने टीआरपी वाढवल्याचे दाखवून केलेला हा आर्थिक घोटाळा तर आहेच परंतु भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्राचाही तो एक भाग आहे, अशी घणाघाती टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई पोलिसांनी उघड केलेला हा घोटाळा लोकशाहीच्या हितासाठी असून आम्ही त्याचे स्वागत करतो, असे म्हटले आहे.

देश पातळीवरती लोकशाहीमध्ये जनमानसाचा स्वंतत्रपणे विचार करुन मत ठरवण्याचा अधिकार संपुष्टात आणण्याकरिता त्यांची विचार करण्याची क्षमताच कुंठीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असत्याला सत्य म्हणून दर्शवावे व विरोधी पक्षांच्या सरकारांविरोधात कृत्रिम जनक्षोभ निर्माण करावा, याकरता मोदी सरकारच्या मदतीने एक कुटील कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. यामध्ये मोदी संचालित वाहिन्यांचा मोठा सहभाग आहे. यानुसार मुंबई पोलिसांनी जो घोटाळा उघड केला. त्यामध्ये भाजपाचा अजेंडा राबवणाऱ्या एका वाहिनीने फ्रॉड करुन आपला टीआरपी जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. याअनुषंगाने आम्ही जे दाखवतो ते सत्य आणि आम्ही जे म्हणतो तीच जनभावना हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला यामध्ये इतर वाहिन्यांचा टीआरपी कमी झाल्याने सदर वाहिनीवर दाखवलेल्या बातम्या जनतेला आवडतात असा समज होऊन त्याही त्याच बातम्या दाखवण्यास सुरुवात करतात. यातून देशाचे नॅरेटीव्ह तयार केले जाते, असे सचिन सांवत यांनी सांगितले.

याचबरोबर, सुशांत सिंह प्रकरणात हेच घडले आहे. सदर वाहिनी सातत्याने सुशांत सिंहची आत्महत्या नसून त्याला मारले गेले आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न करत होती व याला अधिक बळ मिळावे, याकरिता सोशल मीडियाध्ये हजारो खोटी फेसबुक, ट्वीटर अकाऊंट व यूट्यूब चॅनेल तयार करण्यात आली. यातून अफवा, खोटी माहिती, खोट्या बातम्यांचा प्रचार करण्यात आला. या खोट्या माहितीच्या आधारावर देशामध्ये जनक्षोभ आहे आणि तो जनक्षोभ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात आहे अशा प्रकारचे वातावरण तयार करुन मुंबई पोलीस व महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. त्याचबरोबर बिहारच्या निवडणुकीत सुशांत सिंहच्या मृत्यूचा मुद्दा बनवण्यात आला. या खोट्या नॅरेटीव्हवर स्वार होऊन भाजपाने आपली राजकीय पोळी भाजून घेतली. हीच कार्यपद्धती पालघर साधू हत्याकांडानंतर वापरलेली पाहायला मिळाली. भाजपाच्या मॉडेलमधला हा मोहरा अडचणीत आल्याने, त्याची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेल्याने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रकाश जावडेकर हे त्याच्या मदतीसाठी धडपड करत आहेत, असे सचिन सावंत म्हणाले. 

सुशांत प्रकरणात मोदी सरकारच्या दबावामुळेच तीन-तीन राष्ट्रीय तपास यंत्रणा या मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालू असल्याची जाणीव असतानाही गुंतवल्या गेल्या. एम्स पॅनेलचा रिपोर्ट आल्यानंतर आता सदर वाहिनीमार्फत चालवलेला अप्रप्रचार खोटा होतो हे उघडकीस आले आहे. परंतु भारतीय जनता पक्ष सदर वाहिनीची गेलेली पत थोड्याफार प्रमाणात सांभाळण्याकरता तसेच बिहारच्या निवडणुकीत काही काळ मुखभंग होण्याचे टाळण्यासाठी एम्स पॅनलचा रिपोर्ट नाकारण्याकरता सीबीआयवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सचिन सावंत म्हणाले.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत