निवडणूक निधीसाठी प्रहारने फिरविली यवतमाळात झोळी, शेतक-याच्या विधवेला दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:18 IST2019-03-25T13:56:57+5:302019-03-25T15:18:54+5:30
लोकसभेच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने शेतक-याची विधवा असलेल्या अंगणवाडी सेविकेला उमेदवारी जाहीर केली आहे.

निवडणूक निधीसाठी प्रहारने फिरविली यवतमाळात झोळी, शेतक-याच्या विधवेला दिली उमेदवारी
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने शेतक-याची विधवा असलेल्या अंगणवाडी सेविकेला उमेदवारी जाहीर केली आहे. या गरीब उमेदवाराचा निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी यवतमाळातील बसस्थानक चौकात लोकवर्गणीसाठी झोळी फिरवून निवडणूक निधी गोळा केला.
यवतमाळात ११, १२ व १३ जानेवारीला पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक, शेतकरी विधवा वैशाली येडे (राजुरा ता. कळंब जि. यवतमाळ) यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले आहे. नामांकन दाखल करण्यापूर्वी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवतीर्थावर रक्तदान केले. त्यानंतर बैलगाडीद्वारे उमेदवाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर नामांकनासाठी नेण्यात आले. त्यानंतर लोकवर्गणीसाठी शहरात झोळी फिरवून निवडणूक निधी गोळा करण्यात आला.