शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

475 जागांसाठी प्रचार ताेफा थंडावल्या; निवडणुकीचा सर्वांत माेठा टप्पा मंगळवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 07:02 IST

६ हजार २९३ उमेदवार रिंगणात

मुंबई : सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील सर्वांत माेठा आणि महत्त्वाचा टप्पा ६ एप्रिलला पार पडणार आहे. तब्बल ४७५ जागांसाठी मतदान हाेणार असून त्यासाठीचा प्रचार आज थांबला. पश्चिम बंगाल आणि आसाम येथील अनुक्रमे ३१ आणि ४० जागांसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडणार आहे. तसेच तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी येथील सर्व जागांसाठी ६ तारखेला एकाच टप्प्यात मतदान हाेणार असून एकूण ६ हजार ४५४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप नेते अमित शहा यांनी आसाममध्ये प्रचार सभा आणि राेड शाेंचा धडाका लावला, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचार केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही जाेरदार प्रचार केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केरळमध्ये प्रचार सभा घेतल्या. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती राॅबर्ट वाड्रा यांना काेराेना झाल्यामुळे केरळ, तमिळनाडू आणि आसाममध्ये प्रचार करता आला नाही. ३१ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान हाेत आहे. या टप्प्यात हावडा, हुगली आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमधील मतदारसंघांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात २०५ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी केवळ १३ महिला उमेदवारांचा त्यात समावेश आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले स्वपन दासगुप्ता हे तारकेश्वर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. भाजपमध्ये दाखल झालेली अभिनेत्री तनुश्री चक्रवर्ती ही श्यामपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ६ एप्रिलला आसाममध्ये विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा आहे. अखेरच्या टप्प्यात ४० जागांसाठी ३५७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे नेते हिमन्ता बिस्व सर्मा हे गुवाहाटीतील जालुकबरी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निवडणूक आयाेगाने त्यांना प्रचार करण्यापासून राेखले हाेते, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या वाहनात ‘ईव्हीएम’ आढळल्यानंतर खळबळ उडाली हाेती. या पार्श्वभूमीवर आसाममध्ये मतदान हाेणार आहे. २३४ जागांसाठी तमिळनाडूमध्ये मतदान हाेणार असून ४ हजार ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जे. जयललिता आणि एम. करुणानिधी या दाेन दिग्गजांच्या निधनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. विद्यमान मुख्यमंत्री ‘एआयएडीएमके’चे नेते ई. पलानीस्वामी हे एडाप्पडी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत, तर त्यांचे विराेधी ‘डीएमके’चे नेते एम. के. स्टॅलिन हे काेलथूर येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच ‘एएमएमके’चे नेते टी.टी.व्ही. दिनकरन हे काेविलपट्टी येथून निवडणूक लढवीत आहेत. राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन उत्तर काेईम्बतूर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. ३० जागांसाठी ६ तारखेला पुदुच्चेरीमध्ये मतदान हाेणार आहे. एकूण ३२४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सत्ताधारी काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे व्ही. नारायणसामी यांचे सरकार पडले. नारायणसामी यांनी यावेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ‘एआयएनआरसी’चे नेते एन. रंगास्वामी हे यनम आणि थत्तंचावडी या दाेन मतदारसंघांतून निवडणूक लढवीत आहेत. १४० जागांसाठी केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान हाेणार आहे. त्यासाठी ९५८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. मेट्राेमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांना भाजपने पलक्कड येथून उमेदवारी दिली आहे. केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे धर्मादम येथून निवडणूक लढविणार आहेत. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते ओमेन चंडी हे पुथुपल्ली येथून विधानसभेच्या रिंगणात आहेत. इंडियन युनियन मुस्लीम लीगने २५ वर्षांमध्ये प्रथम नूरबीना राशीद यांच्या रूपाने एका महिलेला उमेदवारी दिली आहे, तर अनन्या एलेक्स या केरळमध्ये विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी ठरल्या.